सौदी अरबमध्ये पुरुषांवर ‘या’ 4 देशांमधील महिलांशी लग्न करण्यास निर्बंध, पाकिस्तानसह कोणत्या देशांचा समावेश?

सौदी अरबमध्ये (Saudi Arabia) सरकारने तेथील पुरुषांवर जगातील 4 देशांच्या नागरिक असलेल्या महिलांसोबत लग्न करण्यास निर्बंध घातले आहेत.

सौदी अरबमध्ये पुरुषांवर 'या' 4 देशांमधील महिलांशी लग्न करण्यास निर्बंध, पाकिस्तानसह कोणत्या देशांचा समावेश?
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:11 AM

Saudi Arabia Prohibits Men From Marrying Women of Four Countries: सौदी अरबमध्ये (Saudi Arabia) सरकारने तेथील पुरुषांवर जगातील 4 देशांच्या नागरिक असलेल्या महिलांसोबत लग्न करण्यास निर्बंध घातले आहेत. या देशांमध्ये पाकिस्तानसह (Pakistan), बांग्लादेश (Bangladesh), चाड (Chad) आणि म्यानमारचा (Myanmar) समावेश आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने सौदी अरबमधील माध्यमांच्या आधार घेत ही माहिती दिलीय. यामधील आकडेवारीनुसार, सध्या सौदी अरबमध्ये या 4 देशांमधील 5 लाख महिला आहेत. त्यामुळे या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जातं (Saudi Arabia make strict rules to prohibits Men From Marrying Women of Four Countries).

मक्का डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, मक्काचे पोलीस संचालक मेजर जनरल अस्साफ अल कुरैशी म्हणाले, “सौदी अरबमधील पुरुषांना कोणत्याही परदेशी महिलेशी लग्न करायचं असेल तर त्यांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे (Saudi Arabia New Rules For Marriage). सौदी अरबचे पुरुषांनी परदेशी महिलांशी लग्न करु नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर कुणाला असं लग्न करायचं असेल तर त्यांना आधी सरकारकडून त्याची परवानगी घ्यावी लागेल.”

परदेशी महिलेसोबत लग्नासाठी सरकारची परवानगी गरजेची

“ज्या पुरुषांना सरकारने बंदी घातलेल्या 4 देशांमधील महिलांशी लग्न करायचं आहे त्यांना तसं करण्याआधी सरकारकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी रितसर अर्जही करावा लागेल (Saudi Arabia Marriage Law). एखाद्या व्यक्तीने आपल्या आधीच्या पत्नीपासून घटस्फोट केलेला असेल तरी त्याला पुढील 6 महीने पूर्ण होईपर्यंत लग्नासाठी अर्ज करता येणार नाही. अर्जदाराचं वय 25 पेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. सोबत इतर कागदपत्रं देणंही आवश्यक आहे,” असंही कुरैशी यांनी नमूद केलं.

कोणते कागदपत्रं लागणार?

कोणत्याही अर्जदाराला लग्नासाठी अर्ज करताना आपली ओळख स्पष्ट करणारी कागदपत्रं द्यावी लागणार आहेत. याशिवाय इतरही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. यात कुटुंब ओळखपत्राचाही समावेश आहे. जर अर्जदार विवाहित असेल तर संबंधिताला त्या अर्जासोबत आपली पत्नी अपंग किंवा आजारी किंवा वांझ असल्याचं प्रमाणपत्र जोडावं लागेल.

हेही वाचा :

Video | ‘हे’ लग्न पाहून सगळे अवाक्, एवढे योगायोग कसे? सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

Photo: ‘एका लग्नाची अनोखी गोष्ट’; शार्दुलने मंगळसूत्र का घातलं?, पाहाच

आधी धमकी, मग करुन दाखवलं; मुलगी नाही दिली म्हणून सासूलाच पळवलं

व्हिडीओ पाहा :

Saudi Arabia make strict rules to prohibits Men From Marrying Women of Four Countries

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.