पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता गेल्यास पंतप्रधान कोण? शाहबाज शरीफ यांचं नाव आघाडीवर

पाकिस्तानातील (Pakistan) सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचं पंतप्रधान पद जाणं आता जवळपास निश्चित झालं आहे.

पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता गेल्यास पंतप्रधान कोण? शाहबाज शरीफ यांचं नाव आघाडीवर
शाहबाज शरीफImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:18 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानातील (Pakistan) सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचं पंतप्रधान पद जाणं आता जवळपास निश्चित झालं आहे. अविश्वास ठरावावरील मतदानाअगोदर इमरान खान राजीनामा देतील अशी चर्चा आहे. इमरान खान यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकार पाडण्यामध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इमरान खान यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 3 वर्ष 10 महिने पूर्ण झालाय. तर, अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला आहे. मात्र, पाकिस्तानात आतापर्यंत एकही पंतप्रधान त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकलेला नाही. इमरान खान यांच्या जागेवर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या नवाची चर्चा सुरु आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे ते भाऊ आहेत.

शाहबाज शरीफ यांचं नाव चर्चेत

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत इमरान खान यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना नेक्स्ट पीएम ऑफ पाकिस्तान असं म्हटलं जातंय. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शाहबाज शरिफ यांनी म्हटलं आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. त्यांना पीएम प्रोटोकॉल देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं बोललं जातंय. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत पीएमएल-एन या पक्षाकडून शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलं होतं. मात्र,त्यावेळी इमरान खान यांच्या पीटीआयला बहुमत मिळालं होतं.

विविध पदावर काम

शाहबाज शरीफ यांची प्रशासनावर चांगली पकड असून ते प्रशासक म्हणून ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रातांचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. 1951 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. मरहूम मिया मुहम्मद हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. 1997 ते 1999, 2008-2013, 2013-2018 या वर्षी त्यांनी पंजाबचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

भारतातून कुटुंब पाकिस्तानात

मुहम्मद शरीफ हे व्यावसायिक होते. त्यांची आई पुलवामा येथे वास्तव्यास होती. व्यवसायासाठी ते काश्मीरला जात होते. त्यांचं कुटुंब पंजाबच्या अमृतसरमध्ये स्थलांतरित झालं. तर, 1947 च्या फाळणीच्या वेळी शरीफ कुटुंब लाहोरला गेलं. शाहबाज यांना चार मुलं आहेत. 2003 मध्ये त्यांनी दुसरं लग्लन केलं आहे. व्यावसायिक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरु केली होती. 1985 मध्ये त्यांनी लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडरस्ट्रीचं अध्यक्षपद स्वीकारलं.1987 -88 मध्ये शाहबाज शरीफ सक्रीय राजकारणात आले. 1988-1990 या काळात ते पंजाब विधानसभेचे सदस्य होते. 1990 ते 1993 मध्ये ते नॅशनल असेंब्लीचे सदस्य राहिलेत.

मनी लॉंड्रिंगमध्ये तुरुंगवास

शाहबाज शरीफ हे कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात देखील गेले आहेत.सप्टेंबर 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांना अटक करण्यात आली होती. तर, एप्रिल 2021 मध्ये ते जामीनावर बाहेर आले होते.

इतर बातम्या:

Ajmal kasab : अजमल कसाबचा पत्ता भारताला नवाज शरीफ यांनी दिला, पाकिस्तानी मंत्र्याचा खळबळजनक दावा

Imran Khan: शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार, इमरान खान यांच्या भेटीला आर्मी चीफ, ISI चे डीजी; पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.