Special Story : अफगाणिस्तान, सीरियात जे पेरलं तेच अमेरिकेत उगवलं? फोडा आणि राज्य करा

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्याच संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला करत हिंसाचार केल्याने काही देशांकडून अमेरिका टीकेचा धनी होत आहे.

Special Story : अफगाणिस्तान, सीरियात जे पेरलं तेच अमेरिकेत उगवलं? फोडा आणि राज्य करा
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 5:11 PM

वॉशिंग्टन : जगभरात अमेरिकेची प्रतिमा महासत्ता अशी आहे. याआधी जगभरात अमेरिकेने याच महासत्ता असण्याच्या भूमिकेतून अनेक देशांच्या अंतर्गत कलहात भूमिका घेतली आणि लोकशाहीची बाजू घेत असल्याचं सांगत सशस्त्र लढाया देखील केल्या. या वेळी अमेरिकेने आपण लोकशाही मुल्यांचे पुरस्कर्ते असल्याचा दावा करत अनेक देशांमध्ये सैन्य कारवाई केल्या. काही ठिकाणी अशा कारवायांना पाठिंबाही दिला. मात्र, आता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्याच संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला करत हिंसाचार केल्याने काही देशांकडून अमेरिका टीकेचा धनी होत आहे (Special Story on America Capitol Violence and role of USA in Afghan Syria allegations).

अमेरिकेने अफगाणिस्तान आणि सीरियासह जगभरातील विविध देशांमध्ये जे पेरलं तेच आत्ता अमेरिकेत उगवत असल्याची टीका जोरदारपणे होत आहे. या टीकेत चीनने देखील अमेरिकेवर दुटप्पीपणाचा आरोप करत सडकून टीका केली. चीन सरकारच्या मालकीचं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमध्ये अमेरिकेला हाँगकाँगमधील आंदोलनांना पाठिंबा दिल्याबद्दल लक्ष्य करण्यात आलं.

हाँगकाँगमध्ये 2019 मध्ये तेथील नागरिकांनी लोकशाहीची मागणी करत हाँगकाँगच्या कायदेमंडळावर आंदोलन केलं होतं. यावेळी अमेरिकेने या आंदोलनांना पाठिंबा दिला होता. त्यामुळेच चीनने वॉशिंग्टनमधील कायदेमंडळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेवर आगपाखड केली. तसेच अमेरिका हाँगकाँगमधील आंदोलनाला लोकशाहीवादी म्हणतं आणि आता वॉशिंग्टनमधील आंदोलनाला लोकशाहीविरोधी का म्हणते? असा सवाल चीनने विचारला.

रशियाने देखील चीनच्या सुरात सूर मिसळत अमेरिका दोन काठांवर उभं राहत असल्याची टीका केली. रशियाच्या परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख कोन्स्टांटीन कोसाचेव म्हणाले, “अमेरिकेने इतरांवर लोकशाही लादण्याचे सर्व अधिकार गमावले आहेत. त्यांना इतरांवर गोष्टी लादण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही.”

इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी देखील अमेरिकेला लाथाडले आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील काँग्रेसमध्ये जे घडलं त्यावरुन पाश्चिमात्य लोकशाही किती कमकुवत आहे हेच सिद्ध होते, असं मत रौहानी यांनी व्यक्त केलं. झिम्बॉब्वेचे अध्यक्ष इमर्सन यांनी देखील ट्विट करत अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “मागील वर्षी अमेरिकेने झिम्बॉब्वेवर निर्बंध टाकले. मात्र, आता घडलेल्या घटनांवरुन अमेरिकेला लोकशाहीच्या नावावर इतर देशांवर निर्बंध लादण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचं स्पष्ट होतं.”

एकूणच जगभरातून अमेरिकेतील संसदेवर ट्रम्प समर्थक जमावाने केलेल्या हिंसक हल्ल्याचा जसा निषेध झालाय, तसाच अमेरिकेवर इतर देशांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचाही आरोप झाला. तसेच अमेरिका इतर देशांमधील अशा आंदोलनांना प्रोत्साहन देत तेथे सत्तांतर करते. मात्र, स्वतःवर वेळ आल्यावर याला लोकशाहीची हत्या मानते, असंही मत व्यक्त होत आहे.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएवर (CIA) देखील इतर देशांमध्ये हिंसाचार केल्याचे आणि तेथील सत्तांतर घडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे अनेकदा आरोप झालेत. त्यामुळेच अमेरिकेवर होणारा पेरलं ते उगवल्याचा आरोप पुसून काढण्यासाठी बरिच मेहनत घ्यावी लागणार आहे, असंच दिसतंय. यासाठी अमेरिका काय पाऊलं उचलणार हेही पाहावं लागणार आहे.

हेही वाचा :

US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?

डोनाल्ड ट्रम्पना हटवलं जाऊ शकतं का? कसे? वाचा ‘अमेरिकन यादवीतली’ मोठी बातमी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.