घर साफ करण्यात 6 तास घालवले, 74 हजार रुपयांचे बिल पत्नीला आले, तिने दिले असे मजेदार उत्तर
पतीने घर साफ करण्यात 6 तास घालवले. यानंतर 74 हजार रुपयांचे बिल पत्नीला पाठविण्यात आले. पत्नीने बिल भरण्यास नकार दिला. शिवाय तिने मजेदार उत्तर दिले. पत्नीचे ते उत्तर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे.
ब्रिटन | 31 जानेवारी 2024 : “गेल्या आठवड्यात आमच्याकडे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जेव्हा एका ग्राहकाने पैसे देण्यास नकार दिला! एका मोठ्या कोपऱ्यातील गालिचे आणि फरशी, तीन बेडरूमची साफसफाई केली. त्यासाठी सहा तास खर्च केले. ग्राहकाने आम्हाला सांगितले की साफसफाईमुळे तो खूप आनंदी आहे. त्यावेळी आम्ही त्याला आमच्या कामाचे बिल दिले. पण, आश्चर्य म्हणजे त्या ग्राहकाने बिल भरण्यास नकार दिला. ही तक्रार आहे एका पतीची. विशेष म्हणजे त्याने आपल्याच पत्नीला हे बिल पाठविले आहे.
मार्क हॅच हा यूकेमध्ये स्वतःचा साफसफाईचा व्यवसाय करतो. त्यामुळे संपूर्ण घराच्या स्वच्छतेची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. पत्नीने त्याला संपूर्ण घराची साफसफाई करण्याचे काम सांगितले. 6 तास त्याने काम केले. त्याने केलेली घराची साफसफाई पाहून पत्नी खुश झाली. पण, त्याचवेळी मार्कने पत्नी जस्मिन हिला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठविला.
साफसफाई केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मार्क याने पत्नी जस्मिन हिला व्हॉट्सॲपवर बिल पाठविले होते. हे बिले पाहून जास्मिन हिला धक्का बसला. करणे मार्क याने तब्बल 700 पौंड (सुमारे 73,955 रुपये) इतके बिल पाठवले होते. मात्र, पत्नी जस्मिन हिने पैसे देण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शिवाय तिने मार्क याला जे उत्तर पाठविले ते मजेदार होते.
पत्नीने बिल देण्यास नकार दिला त्यामुळे मार्क याने फेसबुकवर ही संपूर्ण घटना शेअर केली. संपूर्ण घटना कथन करताना त्याने बिल भरण्यास नकार देणारा ग्राहक ही आपली पत्नीच आहे असे सांगण्यासही तो विसरला नाही. फेसबुकवर त्याने पत्नीला पाठवलेल्या बिलाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
स्क्रीनशॉटमध्ये “हाय जस्मिन, कृपया कालच्या स्वच्छतेनंतर तुमची पेमेंट लिंक शोधा. कृपया लिंकवर क्लिक करा आणि तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा. तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद.” असे लिहिल्याचे दिसत आहे. त्याखाली पत्नीने दिलेलं उत्तरही त्याने शेअर केले आहे.
पत्नी जसिम्न हिने ‘कृपया समजून घ्या. आम्ही विवाहित आहोत आणि आम्हाला तीन मुले आहेत.” असे गमतीदार उत्तर तिने दिले आहे. मार्क याने ही तक्रारही गंमतीने केली की आहे. माझी मेहनत आहे त्यामुळे पैसे मिळालेच पाहिजेत असा प्रेमाचा आग्रहही त्याने केला आहे. या जोडप्याचे हे मजेदार संभाषण सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे.