Sri Lanka flood : आर्थिक संकटात श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या, आता पावसाने हाहाकार, 600 कुटुंबांना तडाखा
प्रचंड वाढलेली महागाई, आर्थिक संकट, सरकारविरोधातली आंदोलनं आणि जटील राजकीय स्थिती या संकटातून जात असतानाचा आता श्रीलंकेवर अस्मानी संकट कोसळलंय.
कोलंबो : श्रीलंकेसमोरची (Sri Lanka crisis) आव्हानं वाढतच आहेत. आधीच महागाईचं मोठं संकट गडद झालेलं असतानाचा आता मुसळधार पाऊस आणि लॅन्डस्लाईडच्या (Sri Lanka Landslide) घटनांनी श्रीलंकेची जनता बेजार झाली आहे. तब्बल 600 श्रीलंकन कुटुंबांना मुसळधार पावासाचा तडाखा बसल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट सेंटरने याबाबतची माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy rain) आलेल्या पुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. रत्नपुराच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये 2 हजार 290 लोकांना पुराचा फटका बसलाय. तर कालुतारा जिल्ह्यामधील 16 कुटुंबाना पुराने बेहाल केलंय. तब्बल 82 घरांचं मुसळधार पावसानं नुकसान झालंय. तर किनारी भागात राहाणाऱ्या कुटुंबीयांना सतर्कतेचा इशारा देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. याचा फटका श्रीलंकेतील लोकांना बसलाय.
सरकारविरोधात रोष, त्यात पावसाचा हाहाकार…
श्रीलंकेत नुकताच सरकारविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळालेला होता. रस्त्यावर उतरुन श्रीलंकेच्या जनतेनं आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली होती. प्रचंड वाढलेली महागाई, आर्थिक संकट, सरकारविरोधातली आंदोलनं आणि जटील राजकीय स्थिती या संकटातून जात असतानाचा आता श्रीलंकेवर अस्मानी संकट कोसळलंय.
Hungry people in Sri Lanka beat journalists and burn politicians’ villas. pic.twitter.com/tmfG6q3WTv
— RadioGenova (@RadioGenova) May 10, 2022
श्रीलंकेत गेले काही दिवस पावसाची संततधार सुरुच होती. सलग झालेल्या पावसानं नदीला पूर आल्यानं अनेक कुटुंब बेघर झाली आहे. काहींचं स्थलांतर करण्यात आलं असून आतत्कालीन व्यवस्थानाकडून बचावकार्यही जारी करण्यात आलंय.
In Sri Lanka, Anger over the cost of living the public threw politicians’ cars into the waters.
— ?_Imposter_?️ (@Imposter_Edits) May 11, 2022
श्रीलंकेच्या रस्त्यांच्या नद्यांचं रुप आलंय. गुडघाभर पाण्यातून लोकं वाट काढत जात असल्याचंही यावेळी पाहायला मिळलंय. अनेकांनी आयुष्यभराची कमाई या पावासामुळे मातीमोल झाली आहे.