Srilanka Pm Resign : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, आर्थिक संकट आणि हिंसेपुढे अखेर गुडघे टेकले

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आजद आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हिंसा आणि महागाईपुढे अखेर त्यांनी गुडघे टेकले असल्याचे समोर आले आहे.

Srilanka Pm Resign : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, आर्थिक संकट आणि हिंसेपुढे अखेर गुडघे टेकले
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:37 PM

श्रीलंका : श्रीलंकेचे पंतप्रधान (Srilanka Pm Resign) महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी आजद आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हिंसा आणि महागाईपुढे अखेर त्यांनी गुडघे टेकले असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत महागाईने (Inflation) कहर केला आहे. त्यामुळे स्थानिक लेव्हलचा संघर्ष चांगलाच वाढला आहे. लोकांनी आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा जवळपास संपला आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे. हे लक्षात घेऊन, बांगलादेशने करन्सी स्वॅपद्वारे दिलेल्या $ 200 दशलक्ष परतफेडीचा कालावधी एका वर्षाने वाढवला आहे. बांगलादेश बँकेच्या संचालकांनी एका बैठकीत हा निर्णय घेतला. डेली मिररच्या रिपोर्टनुसार, सेंट्रल बँकेचे प्रवक्ते सेराजुल इस्लाम यांनी सांगितले की, कर्जाच्या अटी न बदलता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचवेळी सरकारविरोधात जनतेची निदर्शने सुरूच आहेत.

बांगलादेशने 2021 मध्ये कर्ज दिले

बांगलादेशने मे 2021 मध्ये चलन अदलाबदल कराराअंतर्गत श्रीलंकेला $200 दशलक्षची मदत दिली होती. श्रीलंकेने 3 महिन्यांत कर्जाची परतफेड करायची होती, परंतु त्यानंतर श्रीलंका गंभीर आर्थिक संकटात सापडला. यानंतर बांगलादेशने कर्ज परतफेडीची मुदत वाढवली आहे. बांगलादेशने अलीकडेच श्रीलंकेला वैद्यकीय साहित्य पाठवले. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन आणि आरोग्य मंत्री झाहिद मलेक यांनी बांगलादेशातील श्रीलंकेचे उच्चायुक्त सुदर्शन डीएस सेनेविरत्ने यांना राज्य अतिथीगृहात आयोजित टोकन सोहळ्यात ही मदत दिल्याचे जाहीर केले. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील एकता आणि मैत्रीची अभिव्यक्ती म्हणून ही मदत असल्याचे बांग्लादेशकडून सांगण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय मैत्रीचे दर्शन

बांगलादेशने लंकेला संकटाच्या काळात केलेल्या मदतीतून साहजिक आंतरराष्ट्रीय संबंध आणि मैत्रीचे दर्शन घडून आले आहे. दरम्यान, सेनेविरत्ने म्हणाले की, श्रीलंका बांगलादेशशी मैत्रीपूर्ण संबंधांना महत्त्व देते आणि ते अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे. या कालावधीत, बांगलादेशची आवश्यक औषध कंपनी लिमिटेड आणि बांगलादेश असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज यांनी मिळून 100 दशलक्ष किमतीची औषधे श्रीलंकेला पुरवली आहेत. जगभरातून अनेक देशांनी श्रीलंकेला अनेकदा आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मात्र तरीही श्रीलंकेतील आर्थिक संकट अजूनही संपले नाही आणि अशात लंकेच्या पंतप्रधानांनीच गुडघे टेकत राजीनामा दिला असल्याने आता श्रीलंकेला कोण तारणार आणि संकटातून बाहेर काढणार याकडे आता जगाचे डोळे लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.