Sri Lanka: एक अंड 30 रुपये, 1 किलो बटाटी 200 रुपये! जगायचं तरी कसं? श्रीलंकेतील जनतेसमोर प्रश्नच प्रश्न
Sri Lanka Crisis : श्रीलंका पूर्णपणे आर्थिक संकटानं घेरला गेला आहे. श्रीलंकेतील जनता या संकटात पूर्णपणे उद्ध्वस्त होत असून येणाऱ्या दिवसात महागाईचं हे प्रमाण आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
श्रीलंकेत (Srilanka Crisis) नागरिकांची स्थिती अधिकाधिक खालावत चालली आहे. आणीबाणीनंतर आता महागाई दररोज नवा उच्चांक गाठते आहे. श्रीलंकेत तब्बल 200 रुपये किलो इतका बटाट्याचा दर आहे, तर एका अंड्याची (Egg Prices in Sri Lanka) किंमत ही 30 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत असल्यानं सगळ्याच किंमतही या गगनाला भिडल्या आहेत. एक किलो मिल्क पावडरची (Milk Powder Rates in Sri Lanka) किंमत ही तब्बल 1900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या महागाईनं श्रीलंकेतील आर्थिक संकटात सर्वसामान्य भरडले जात आहेत. तांदूळ, गहू, किराणा माल, तेल, साखर, भाजीपाला या सगळ्याचेच दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. आणीबाणी लागू करण्यात आल्यामुळे आता लोकांना कुठेही जाण्यास परवानगी नाही आहे. आणीबाणीनंतर श्रीलंकेत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
कशाची किंमत काय?
- एक किलो बटाटे – 200 रुपये
- एक अंड – 30 रुपये
- एक किलो मिल्क पावडर – 1900 रुपये
- एक किलो तांदूळ – 500 रुपये
- एक लीटर नारळाचं तेल – 850 रुपये
- एक किलो साखर – 250 रुपये
- मिरची – 700 रुपये
- एक कप चहा – 100 रुपये
- दूध पॅकेट – 790 रुपये
आर्थिक संकाटनं घेरलं!
श्रीलंका पूर्णपणे आर्थिक संकटानं घेरला गेला आहे. श्रीलंकेतील जनता या संकटात पूर्णपणे उद्ध्वस्त होत असून येणाऱ्या दिवसात महागाईचं हे प्रमाण आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे लोक अधिकच भयभीत झाले आहेत.
श्रीलंकेत सव्वा दोन कोटी इतकी लोकसंख्या आहे. या सगळ्याच लोकांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे सरकारनं लावलेल्या निर्बंधांमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोषही निर्माण झाला आहे. हिंसेच्या भीतीपोटी सरकारनं लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावले आहेत. तसंच रस्त्यांवर सैन्यही तैनात करण्यात आलंय.
सध्या श्रीलंकेत कर्फ्यू लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरीक्त कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस, सैन्य दलालाही आणीबाणीच्या घोषणेनंतर जागोजागी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलंय.
इतर आंतरराष्ट्रीय बातम्या :
America Firing : अमेरिकेत बेधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी
इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!
डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदत… जाणून घ्या काय होईल फायदा