OpenAI ची झोप उडवणाऱ्या भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, कोण होता सुचीर बालाजी?

Suchir Balaji Death : अधिकाऱ्यांना फ्लॅटमध्ये सुचीरचा मृतदेह आढळला. अधिकारी आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली. ChatGPT सारख्या APP मुळे इंटरनेटच्या संपूर्ण इकोसिस्टिमच नुकसान होईल अशी भिती सुचीर बालाजीने बोलून दाखवली होती.

OpenAI ची झोप उडवणाऱ्या भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, कोण होता सुचीर बालाजी?
suchir balaji
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 11:21 AM

OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीचा माजी रिसर्चर सुचीर बालाजी त्याच्या अमेरिकेतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. OpenAI कंपनीनेच ChatGPT डेवलप केलय. आधी OpenAI साठी काम करणाऱ्या सुचीर बालाजीने नंतर कंपनीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच सुचीर बालाजीच्या मृत्यूबद्दल समजलं. आज ही घटना सगळ्या जगासमोर आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुचीर बालाजी (26) सॅन फ्रान्सिस्कोच्या बुकानन येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला.

परदेशी मीडियानुसार, सुचीर बालाजीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण काही संशयास्पद आढळून आलेलं नाही. सुचीर बालाजी मागच्या काही दिवसांपासून मित्रांच्या, सहकार्यांच्या संपर्कात नव्हता. त्यांना चिंता वाटली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सॅन फ्रान्सिस्को पोलीस 26 नोव्हेंबरला दुपारी 1 च्या सुमारास बालाजीच्या लोअर हाईट निवासस्थानी पोहोचले.

गडबड असल्याचे संकेत नाहीत

अधिकाऱ्यांना फ्लॅटमध्ये सुचीरचा मृतदेह आढळला. अधिकारी आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली, त्यावेळी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला असं पोलिसांनी सांगितलं. हे आत्महत्येसारखं वाटत होतं. सुरुवातीच्या तपासात काही गडबड असल्याचे संकेत मिळालेले नाहीत.

सुचीर बालाजीने काय आरोप केलेला?

OpenAI ने अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्याच उल्लंघन केलय असं सुचीर बालाजीने मृत्यूच्या तीन महिने आधी सार्वजनिक रित्या दावा केला होता. ओपन एआयने चॅटजीपीटी बनवलय. जागतिक स्तरावर कोट्यवधी लोक चॅटजीपीटीचा वापर करतायत. OpenAI चे हे प्रोडक्ट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलं आहे.

चुकीच्या गोष्टींबद्दल मजबुतीने आवाज उठवला

कंपनीने बेकायद पद्धतीने APP विकसित करण्यासाठी आमच्या कॉपीराइट कंटेंटचा वापर केला, असा लेखक, प्रोग्रॅमर आणि पत्रकारांनी आरोप केला होता. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी सुचीर बालाजीने जगाचा निरोप घेतला. त्याने चॅटजीपीटी डेवलप करण्यात योगदान दिलच. पण कंपनीतील चुकीच्या गोष्टींबद्दल मजबुतीने आवाज उठवला.

कोण होता सुचीर बालाजी?

इंटरनेटच्या संपूर्ण इकोसिस्टिमच यामुळे नुकसान होईल अशी भिती सुचीर बालाजीने बोलून दाखवली होती. त्याचं बालपण कॅलिफोर्नियाच्या कूपर्टिनोमध्ये गेलं. त्यानंतर यूसी बर्कलमध्ये कॉम्प्युटर सायन्सच शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये शिकताना त्याला AI मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. वाढत्या वयाला रोखणं, आजार बरं करण्यासंदर्भात AI रिलेटेड रिसर्च सुरु केला.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.