Suez canal: भारतीय चालकाची चूक भोवली अन् ते अवाढव्य जहाज कालव्यात रुतलं?

या जहाजावरचा कर्मचारी वर्ग भारतीय आहे. | Suez Canal Blockage

Suez canal: भारतीय चालकाची चूक भोवली अन् ते अवाढव्य जहाज कालव्यात रुतलं?
या दुर्घटनेसाठी मानवी चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 11:32 AM

कैरो: आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) एक अवाढव्य जहाज अडकून पडले आहे. त्यामुळे या जलमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे जहाज कालव्यात रुतले असून ते बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरु आहेत. सुएझ कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्याने अवघ्या पाच दिवसांतच हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या Ever Given या जहाजाची आणि सुएझ कालव्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हे जहाज किनाऱ्याकडे ढकलले गेले, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता दुर्घटनेसाठी मानवी चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. (All-India crew of cargo ship wedged in Egypt’s Suez Canal safe)

या जहाजावरचा कर्मचारी वर्ग भारतीय आहे. तर या जहाजाचे सारथ्य इजिप्तच्या अधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे आता हा अपघात भारतीय खलाशांच्या चुकीमुळे घडला, अशी चर्चा सुरु झाली आहे.

जहाज बाहेर काढण्यात कोणते अडथळे?

अनेक प्रयत्न करुनही हे जहाज बाहेर काढण्यात यश न आल्याने आता अमेरिकन नौदलाला पाचारण करण्यात आले आहे. समुद्राच्या लाटा आणि वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे जहाज काढण्यासाठी अडचणी येत आहेत. जहाजाभोवती असलेली माती, चिखल काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तत्पूर्वी या जहाजाला इतर लहान जहाजांनी धक्का मारुन प्रवाहात ढकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

सुएझ कालव्यात किती जहाजं रांगेत?

सुएझ कालव्याची वाहतूक ठप्प झाल्याने आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण भागात एकूण 200 पेक्षा अधिक जहाजं रांगेत उभी आहेत. यात दररोज 60 जहाजांची भर पडत आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस हा कालवा बंद राहिला तर रांगेत उभ्या असलेल्या जहाजांची संख्या 350 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी संपायला आणखी एक आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?

PHOTOS : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट, आता अमेरिका मदत करणार

(All-India crew of cargo ship wedged in Egypt’s Suez Canal safe)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.