America vs Russia | ‘या’ देशांना अमेरिकेच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी व्लादिमीर पुतिन काय करणार?
America vs Russia | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन Action मध्ये येऊ शकतात. लवकरच युद्ध भूमीवर पुतिन पूर्ण ताकदीनिशी एन्ट्री करतील असं बोलल जातय. पुतिन यांच्याकडून मजबूत रणनितीसह अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
America vs Russia | अमेरिकेने शक्तीशाली प्रहार केलाय. त्यामुळे मागच्या तीन दिवसांपासून तीन देश हादरुन गेले आहेत. सीरिया-येमेन आणि इराकच्या भूमीवर अमेरिकन फायटर जेट्स आग ओकत आहेत. अमेरिकेच्या एअर स्ट्राइकने खळबळ उडाली आहे. जे घमासान सुरु आहे, त्यात आता महाशक्ती रशियाची एन्ट्री होऊ शकते. अमेरिकेने सीरिया, येमेन आणि इराकमध्ये इराणच समर्थन असलेल्या गटांना टार्गेट केलय. पण आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन Action मध्ये येऊ शकतात. इराणही युद्ध तयारीच्या मोडमध्ये आहे. लवकरच युद्ध भूमीवर पुतिन पूर्ण ताकदीनिशी एन्ट्री करतील असं बोलल जातय.
अमेरिकेची बॉम्बर आणि फायटर विमान आकाशातून सीरिया-येमेन आणि इराकच्या भूमीवर दारुगोळा आणि मिसाइल्सचा वर्षाव करत आहेत. अमेरिकेच्या या ट्रेलरनंतर पुतिन एक्टिव झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पुतिन यांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक केली. आता पुतिन अमेरिकेविरोधात मुस्लिम देशांना एकजूट करत आहे.
पुतिन यांचा प्लान काय?
पुतिन मजबूत रणनितीसह अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. सुपर पॉवर विरोधात मुस्लिम देशांना एकजूट करुन नवी आघाडी उभारण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्याबाजूला अमेरिकी हल्ल्याने बिथरलेल्या इराण समर्थक गटांनी अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सीरियामधील अमेरिकी तळावर 2 मिसाइल हल्ले झालेत. इराकमधील अमेरिकी तळावर बॉम्बफेक करण्यात आलीय. कताइब हिज्बुल्लाह आणि इस्लामिक सीररेजिस्टेंसकडून हा हल्ला करण्यात आलाय.
इराण समर्थक गटाची ठिकाण उद्धवस्त
इराण समर्थक गट बदला घेण्यासाठी आसुसले आहेत. सीरिया आणि इराकमध्ये अमेरिकी हल्ल्यात मोठ नुकसान झालय. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराण समर्थक गटाची ठिकाण उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे इराण खवळला आहे. इराणकडून अमेरिकेला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. म्हणून कताइब हिज्बुल्लाह आणि इस्लामिक सीररेजिस्टेंसकडून हल्ले करण्यात आले.
कुठल्याही क्षणी आर-पारची लढाई
अनेक दशकांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये शत्रुत्व सुरु आहे. आता ताज्या हल्ल्यानंतर तणाव टिपेला पोहोचलाय. कुठल्याही क्षणी खाडीमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये आर-पारची लढाई होईल, अशी भिती आहे. अमेरिकेने येमेन, सीरिया आणि इराकमध्ये ज्या पद्धतीचे हल्ले केले आहेत, ते पाहता कधीही युद्धाची ठिणगी पेटू शकते.