US Fire: अमेरिकेत धडकी भरवणारा मृत्यूचा थरार, टेक्सासमधील शाळेत अंदाधुंद गोळीबार, 18 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू
US Fire: हे एक छोटसं शहर आहे. या शहराची लोकसंख्या 20 हजाराच्या आसपास आहे. एबॉट यांच्या मते, डिसेंबर 2012मध्ये सँडी हूक स्कूलमध्ये या पूर्वी फायरिंग झाली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. सँडी हूक स्कूलमधील गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला होता.
टेक्सास: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये (Texas) धडकी भरवणारा मृत्यूचा थरार पाहायला मिळाला आहे. टेक्सासमधील एका प्राथमिक विद्यालयात (Texas elementary school) एका 18 वर्षीय शूटरने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि एका शिक्षकासह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण शाळेत रक्ताचे सडे पसरले आहेत. त्यामुळे एकच टेक्सासमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी शाळेत धाव घेऊन एकच आक्रोश केला आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट (Texas Governor Greg Abbott) यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोराला शरण येण्यास सांगितले. मात्र, हल्लेखोराने उलट गोळीबार केला. यावेळी हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. टेक्सासच्या उवाल्डे शहरात ही घटना झाल्याचं एबॉट यांनी सांगितलं. हे एक छोटसं शहर आहे. या शहराची लोकसंख्या 20 हजाराच्या आसपास आहे. एबॉट यांच्या मते, डिसेंबर 2012मध्ये सँडी हूक स्कूलमध्ये या पूर्वी फायरिंग झाली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. सँडी हूक स्कूलमधील गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला होता.
#UPDATE | An 18-year-old shooter shot and killed 14 students and 1 teacher. Shooter himself is deceased believably by responding officers: Texas Governor Greg Abbott said in a presser https://t.co/bM0EY8b3Y7 pic.twitter.com/PpRqcw9zBJ
— ANI (@ANI) May 24, 2022
एका 18 वर्षीय शूटरने हा गोळीबार केला आहे. रॉब प्राथमिक विद्यालयात हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मारेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 विद्यार्थ्यांसह तीन शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. टेक्सासचे गव्हर्नर एबॉट यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. आरोपींने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केली. दुपारी ही घटना घडली. हा शूटर अचानक स्कूल कँम्पसमध्ये घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. पोलिसांना या शूटर्सबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आईवडील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना कँम्पसमध्ये येण्यास मनाई करण्यात आले आहे.
घातक हल्ला
हा हल्ला अत्यंत घातक होता, असं एबॉट यांनी सांगितलं. उवाल्डे हे अत्यंत छोटं शहर आहे. हा भ्याड हल्ला होता, असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. या शाळेत एकूण 600 विद्यार्थी शिकतात.
2012ची पुनरावृत्ती
शाळा प्रशासनाने या हल्ल्याची तुलना 2012च्या सँडी हूक शाळेत झालेल्या हल्ल्याशी करण्यात आली आहे. या शाळेतही गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेमुळे पुन्हा चिंता वाढवली होती. शूटरने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना लक्ष्य केलं आहे.