अनोखी गदर एक प्रेमकथा : पाकिस्तानातून चार मुलांसह पळून आलेल्या सीमाचं पहिलं लग्न लव्ह मॅरेज होतं…

सीमा हैदर पाकिस्तानी सिंध प्रांतातील खैरपूरची रहीवासी आहे, अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या सीमाच्या आई-वडीलांचा मृत्यू झाला आहे. ती तिचा पती हैदरला सोडून चार मुलांना घेऊन सरळ नेपाळ मार्गे भारतातील प्रियकराला भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अनोखी गदर एक प्रेमकथा : पाकिस्तानातून चार मुलांसह पळून आलेल्या सीमाचं पहिलं लग्न लव्ह मॅरेज होतं...
Pakistani-Seema-Haider-2Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:14 PM

नवी दिल्ली : एकीकडे लव्ह जिहादवरुन राजकीय वातावरण तप्त असताना दुसरीकडे पब्जी खेळता खेळता पाकिस्तान सोडून भारतात आपल्या चार मुलांसह आलेल्या सीमा हैदर आणि सचिन याच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदर हीने आपला हिंदूस्थानी बॉयफ्रेंड सचिनच्या प्रेमासाठी तिचा देश सोडला. 13 मे रोजी ती नेपाळ मार्गे लपत लपत आली. आणि नोएडाच्या सचिन सोबत रहात आहे. परंतू पोलिसांनी दोघांना अटक केली, सध्या दोघांना जामीन मिळाला आहे. आधी तिचे लग्न पाकिस्तानी गुलाम हैदरशी जबरदस्ती लावल्याचे म्हटले जात होते. आता मात्र त्याच्याशी लव्ह मॅरेज झाले होते असे उघडकीस आले आहे.

सीमा हैदर पाकिस्तानी सिंध प्रांतातील खैरपूरची रहीवासी आहे, ती खूपच गरीब परिवारातील आहे. तिच्या आईचा आधीच मृत्यू झाला आहे. घरात केवळ सीमाचे वडील, एक भाऊ आणि एक बहिण आहे. साल 2014 मध्ये सीमाच्या मोबाईलवर एक रॉंग कॉल आला. तो कॉल गुलाम हैदर याचा होता. या रॉंग नंबर नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. दोस्तीचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे कळलेच नाही.

सीमाच्या घरातल्यांना हे नातं मंजूर नव्हतं. त्यामुळे ती साल 2014 मध्ये पळून हैदरकडे गेली. गुलाम सिंध प्रांतातील जकोकाबादचा रहीवासी आहे. तिने गुलामशी कोर्ट मॅरेज केले. दोघे बलुची समुदायातील आहेत. त्यामुळे त्यांच्या समाजाला समजताच पंचायत भरली, पंचांनी गुलामला तिच्याशी पळवून लग्न केल्याने दंड आकारला. साल 2015 मध्ये सीमाने कराचीत जाण्याचा हट्ट केला. त्यानंतर दोघे कराचीत भाड्याने राहू लागले.

सीमाचे घरचे लग्नाला राजी झाले. लग्न झाले सीमा आणि हैदराला मुले झाली. तरी त्यांच्यात सारखी भांडणे होत. तिला मुले देखील झाली. साल 2019 मध्ये हैदरला सौदीत नोकरी लागली. परंतू हैदर केवळ फोनवरच बोलायचा, पैसे देखील पाठवायचा पण तिला कधी भेटायलाच आला नाही. मे 2023 मध्ये सीमाचा फोन लागेनाच तेव्हा त्याने त्याच्या वडीलांना कराचीत घरी पाहायला पाठवले. तर घरी कोणीच नव्हते. शेजारी म्हणाले माहेरी गेली असेल, माहेरी तर कोणीच नव्हते.

भारतीय मिडीयातून कळले

अखेर तिच्या सासऱ्याने तक्रार दाखल करायचा निर्णय घेतला. तोपर्यंत भारतीय मिडीयातून कळले की सीमा पाकिस्तानची सीमा ओलांडून नोयडात रहायला गेली आहे. आता युपी पोलिसांनी सचिन आणि सीमाला अटक केली आहे. आता सीमाला भारतातच सचिन बरोबर रहायचे आहे. तर तिचा पहिला पती गुलाम हैदर तिला तिकडे बोलवत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.