श्रीमंत देशाचे नागरिकत्व मिळविण्यात भारतीयांची आघाडी, हा देश पहिली पसंती, OECD चा अहवाल

सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले असले तरी परदेशात जाऊन रहाण्यात कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे देश भारतीय सर्वाधिक पसंत करीत आहेत.

श्रीमंत देशाचे नागरिकत्व मिळविण्यात भारतीयांची आघाडी, हा देश पहिली पसंती, OECD चा अहवाल
passportImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 2:40 PM

नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : सध्या भारत आणि कॅनडा यांचे संबंध भलेही बिघडलेले असतील परंतू भारतातून परदेशात जाऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. असे म्हटले जाते की परदेशात स्थायिक होणार दर सातवा नागरिक भारतीय असतो. इतके भारतीय जगभरात पसरलेले आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन एण्ड डेव्हलपमेंट ( OECD ) च्या सदस्य देशांची नागरिकता साल 2021 मध्ये जवळपास 1.3 लाख भारतीयांनी घेतली आहे. तर अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यासाठी भारतीयांनी पहिली पसंती दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या बातमीनूसार कॅनाडाने परदेशी नागरिकांना नागरिकत्व देण्यात सर्वात आघाडी घेतली आहे. पॅरिस इंटरनॅशनल मायग्रेशन आऊटलूकमध्ये प्रसिद्ध झालेल्या OECD रिपोर्टनूसार साल 2023 मध्ये श्रीमंत देशांचे नागरिकत्व स्विकारण्यात भारतीय सर्वात जास्त आघाडीवर आहेत. तर कॅनाडाने साल 2021 आणि 2022 दरम्यान नागरिकत्व देण्यात 174 टक्के वाढ केली आहे.

गेल्यावर्षी देखील OECD देशांची नागरिकत्व मिळविणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या सर्वात जास्त होती. ही संख्या 28 लाख होती. जी साल 2021 च्या तुलनेत 25 टक्के जादा आहे. मात्र या अहवालात साल 2022 च्या आकडेवारीबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. परंतू साल 2019 पासून भारतातील नागरिकांकडून OECD देशांचे नागरिकत्व स्वीकारण्याचा रोख पाहता भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

नागरिकत्व देण्यात अमेरिका पुढे

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की साल 2021 मध्ये सुमारे 1.3 लाख भारतीयांनी OECD सदस्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. साल 2019 मध्ये हा आकडा सुमारे 1.5 लाख होता. तर चीन या शर्यतीत साल 2021 मध्ये पाचव्या स्थानावर होता. कारण सुमारे 57,000 चीनी लोकांनी ओईसीडी देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 38 सदस्यीय OECD मध्ये प्रमुख तीन देश ज्यांनी साल 2021 मध्ये भारतीय प्रवाशांना पासपोर्ट दिले त्यात अमेरिका ( 56,000 ), ऑस्ट्रेलिया ( 24,000 ) आणि कॅनडा ( 21,000 )

का घेत आहेत भारतीय परदेशी नागरिकत्व

भारतीय अनेक कारणांनी परदेशात राहायला जात आहेत. काही जण शिक्षणासाठी व्हीसा घेऊन जात असतात. काही जण देश-परदेशात फिरायला सोपे व्हावे म्हणून परदेशी नागरिकत्व घेत आहेत. अमेरिका आणि कॅनाडा सारख्या देशांचा पासपोर्ट असला तर अनेक देशात विना व्हीसा देखील प्रवेश मिळत असतो. तसेच परदेशात सरकार अन्य देशांच्या नागरिकांना संवेदनशील क्षेत्रातही नोकरीची संधी देत असते त्यामुळे भारतीय परदेशातून जाऊ रहात आहेत.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.