God Particle: ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध पुन्हा सुरु होणार, चार वर्षांनी महामशिन शोधणार गॉड पार्टिकल

हिग्स बोसान या सिद्धानांताचा शोध दहा वर्षांपूर्वी एडविन हबल यांनी २०१२ साली लावला होता. या मशीनमध्ये प्रोटोनवर उलट्या दिशेने दोन ऊर्जेचे बीम टाकण्यात येतात. यातून गॉड पार्टिकलचा जन्म होतो. ही मशिन तयार करण्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

God Particle: ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध पुन्हा सुरु होणार, चार वर्षांनी महामशिन शोधणार गॉड पार्टिकल
ब्रह्मांड उत्पत्तीचा शोध Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:26 PM

नवी दिल्ली – बीग बँगनंतर स्फोटातून निर्माण झालेल्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध पुन्हा सुरु होणार आहे. चार वर्षांनंतर लार्ज हैड्रन कोलायडर (Large Hadron Collider-LHC) ही मशीन पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा द युरोपीयन काऊन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च (CERN) संस्थेने केली आहे. गॉर्ड पार्टिकल अशी ओळख असलेल्या हिग्स बोसान (Higgs Bosan) याचा शोध पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ही मशीन पुन्हा सुरु करत १३.६ खर्ज इलेक्ट्रोन व्होल्ट ऐवढी ऊर्जा काढण्यात येईल.

हिग्स बोसान सिद्धांताचा शोध १० वर्षांपूर्वीचा

हिग्स बोसान या सिद्धानांताचा शोध दहा वर्षांपूर्वी एडविन हबल यांनी २०१२ साली लावला होता. या मशीनमध्ये प्रोटोनवर उलट्या दिशेने दोन ऊर्जेचे बीम टाकण्यात येतात. यातून गॉड पार्टिकलचा जन्म होतो. ही मशिन तयार करण्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. बिग बँगच्या सिद्धांतानुसार सुमारे १५ अब्ज वर्षंपूर्वी ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती यात अजूनही काही फिजिकल पार्टिकल्स तयार झाले होते. त्यांच्याच मदतीने पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. या मशीनच्या प्रयोगात अनेक भारतीय शास्त्रज्ञही सहभागी आहेत.

चार वर्षे थांबलो होते काम

गेल्या काही दिवसांपासून लार्ज हेड्र्न कोलाडयरच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरु होते. तसेच कोरोनाच्या प्रसारामुळेही काम रोखण्यात आले होते. युक्रेनसोबतच्या रशियाच्या युद्धाचा परिणामही या कामावर झाला होता. द युरोपियन काऊन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्चने अशी घोषणा केली होती ती रशियाशी भविष्यातील सर्व करार तूर्तास थांबवित आहोत. तसेच निरीक्षकपदावरुनही रशियाला हटविण्यात आले होते. रशियातील वैज्ञानिक संस्थांसोबतचे सर्व करारही रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

द युरोपियन काऊन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च

द युरोपियन काऊन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च संस्थेची स्थापना १९५४ साली युरोप, अमेरिका आणि रशियाच्या वैज्ञानिकांनी मिळून केली होती. शीत युद्धाच्या काळातही संस्थेकडून उल्लेखनीय कार्य करण्यात आले. १९६२ साली झालेले कूबन मिसाईल युद्ध, १९७९ साली अफगाणिस्थानात झालेली रशियन सैन्याची घुसखोर, असे अनेक चढ उतार आले तरी संस्थेचे कार्य सुरुच राहिले आहे. आत्तापर्यंत या संस्थेवर राजकीय दबाव नव्हता. यावेळी मात्र रशियाबाबत निर्णय घेण्यात आले.

लार्ज हैड्रन कोलायडर

लार्ज हैड्रन कोलायडरला संचालित करण्याचे कार्य द युरोपियन काऊन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्चतर्फे करण्यात येते. या संस्थेने २०१२ साली हिग्स बोसोनचा शोध लागवा होता. या प्रयोगात जगातील २३ देशांचा समावेश आहे. सात सहकारी सदस्य आहेत. यात युक्रेनचा समावेश आहे. रशियाचा सहभाग अमेरिकेप्रमाणे निरीक्षकाचा आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.