Taliban Laws : महिलांना पुरुषांसोबत फिरण्यास मनाई; तालिबानचा नवा फतवा

अफगाणिस्तानातील काबूल शहरात 'बाग-ए-बाबर' नावाची 500 वर्षे जुनी बाग आहे. या बागेत दररोज शेकडो लोकं आपल्या कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी येत असतात. या आठवड्याच्या सुरुवातील अचानक बागेबाहेर पुरुष व महिलांनी वेगवेगळे बागेत फिरावे असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Taliban Laws : महिलांना पुरुषांसोबत फिरण्यास मनाई; तालिबानचा नवा फतवा
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 9:06 PM

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून येथील नागरीकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू झाल्यापासून तेथील नागरिकांना पुन्हा एकदा गुलामां सारखे आयुष्य जगावे लागत आहे. तालिबान सरकार दररोज नवनवीन फतवे काढत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य वेदनादायी झाले आहे. विशेषत: महिलांसाठी तर तालिबानने अमानुष कायदे(Taliban Laws) बनवले आहेत. नुकताच तालिबानकडून आणखी एक फतवा काढण्यात आला आहे.यात महिलांना पुरुषांसोबत फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

या फतव्या अंतगर्त अफगाणिस्तानातील प्रसिद्ध 500 वर्ष जुन्या बागेत पुरुष व स्त्रियांना एकत्र जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकाच घरातील पुरुष व बायकांनाही एकत्र जाता येणार नाही असे सांगण्य़ात आल्याने नागरिक संतापले आहेत.

अफगाणिस्तानातील काबूल शहरात ‘बाग-ए-बाबर’ नावाची 500 वर्षे जुनी बाग आहे. या बागेत दररोज शेकडो लोकं आपल्या कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी येत असतात. या आठवड्याच्या सुरुवातील अचानक बागेबाहेर पुरुष व महिलांनी वेगवेगळे बागेत फिरावे असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

बागेत पुरुष व महिलांना वेगवेगळ्या दरवाजातून प्रवेश देण्यात येत आहे. तालिबानच्या या नव्या फतव्यामुळे नागरिक वैतागले असून त्यांनी या बागेकडे पाठ फिरवली आहे. जर कुटुंबासोबत फिरायला बागेत यायचं असेल तर आम्ही एक एकटं का फिरायचं असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. या अजब फतव्यामुळे बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

तालिबानमधील कायदा आणि कायदे

  • अफगाणिस्तानमध्ये 1996 ते 2001 पर्यंत तालिबानची सत्ता होती.
  • तालिबानने संपूर्ण देशभरात शरिया कायदा लागू केला होता.
  • मुलींना शाळेत जाण्यास आणि महिलांना काम करण्यास बंदी होती.
  • पुरुषांना नमाज पठण करणे आणि लांब दाढी ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते.
  • आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना सार्वजनिकरित्या शिक्षा दिली जात होती.
  • खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जात होते.
  • जगभरातील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय दिला जाऊ लागला.

तालिबानी कायदे महिलांवर प्रचंड अन्यायकारक असे आहेत. खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.