Ram Mandir | या देशात उभारलं जातंय जगातलं सर्वात उंच राम मंदिर, 150 एकर जागेवर तब्बल 48 मजल्यांएवढं भव्य बांधकाम

येत्या 22 जानेवारीला दुपारी 12.20 वाजताच्या मुहूर्तावर अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. आता आणखी एका देशात राम मंदिराची उभारणी होत आहे. हे जगातील सर्वात उंच राम मंदिर असणार आहे.

Ram Mandir | या देशात उभारलं जातंय जगातलं सर्वात उंच राम मंदिर, 150 एकर जागेवर तब्बल 48 मजल्यांएवढं भव्य बांधकाम
ram-mandir
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 2:02 PM

पर्थ | 19 जानेवारी 2024 : एकीकडे अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी सुरु आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराची विधीवत प्रतिष्ठापना होत आहे. आता जगात इतरही ठिकाणीही राम मंदिराची बांधकामे सुरु आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील राम मंदिराच्या बांधकामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मंदिराची उभारणी श्रीराम वैदिक तथा सांस्कृतिक ट्रस्ट मार्फत सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील 150 एकर जागेवर 600 कोटी रुपयांचे खर्चातून 721 फूटांचे हे जगातील सर्वात उंच राम मंदिर बांधले जात असल्याचे श्री सीताराम ट्रस्टचे डॉ. हरेंद्र राणा यांनी म्हटले आहे. तर चला पाहूयात काय आहेत या सर्वात उंच राम मंदिराची वैशिष्ट्ये…

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील 150 एकर जागेवर हे जगातील सर्वात उंच मंदिर बांधले जाणार आहे. मंदिराच्या परिसरात हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवंत सदन, नल नील तंत्रज्ञान आणि गुरु वशिष्ट ज्ञान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. मंदिराच्या 55 एकर जागेवर सनातन वैदिक विद्यापीठाची उभारणी केली जाईल. हनुमान वाटिकेत 108 फूटाची हनुमानाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे, शिव सप्त सागर नावाच्या कुंड तयार केला जाणार आहे. त्यात भोलेनाथ शंकराची 51 फूटाची प्रतिमाही असणार आहे.

वैदिक पुस्तकांचे अभ्यास केंद्र

वैदिक पुस्तकाचे अध्ययन आणि प्रसार करण्यासाठी या मंदिरात वाल्मिकी केंद्र तयार केले जाणार आहे. श्रीराम वैदिक तसेच संस्कृती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे एक शिष्टमंडळ अयोध्येत श्रीराम मंदिराच्या दर्शनाला येणार आहे. हा पर्थहून येत्या 27 फेब्रुवारीला हे शिष्ठमंडळ दर्शनासाठी निघणार आहे. या शिष्ठमंडळाचे दिल्लीला आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत होणार आहे. या 21 सदस्यांच्या ट्रस्टमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य हरेंद्र पाल राणा यांना उप प्रधान हे पद दिले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील हे राम मंदिर जगातील सर्वात उंच मंदिर असणार आहे. या मंदिरातील काही अद्भूत गोष्टी असतील ज्या तुम्ही कधीच पाहिल्या नसतील असेही राणा यांनी म्हटले आहे.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.