AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात 'हे' पहिल्यांदाच घडतंय
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 3:20 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत (Things happening first time in world due to corona) आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषयक आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

  1. स्पेन,पाकिस्ताननंतर आता ब्रिटनलाही चीन फसवत असल्याचं समोर आलंय. ब्रिटन सरकारनं चीनकडून 35 लाख अँटिबॉडी टेस्ट मागवल्या होत्या. मात्र त्यातील बहुतांश गोष्टी बोगस निघाल्या आहेत. दैनिक नवभारत टाईम्सनं ही बातमी दिलीय. ज्यांची प्रकृती कोरोनामुळं गंभीर बनलीय, फक्त त्यांच्याच प्रतिकारक क्षमतेची चाचणी चीनमधून आलेल्या टेस्ट करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी टेस्ट करण्यास ब्रिटनपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
  2. सिंगापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित झालंय. पूर्ण महिनाभरासाठी सिंगापूरमध्ये लॉकडाऊन असणार आहे. अद्याप तेथील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सिंगापूर लॉकडाऊन होणार आहे. या तासापर्यंत सिंगापूरमध्ये 1375 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि 6 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
  3. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 10 हजारांच्या वर गेलीय. एकट्या न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 30 हजार लोकांना कोरोना झालाय. याच शहरात 4 हजारांहून जास्त लोकांचा जीव गेलाय. जगभरात सध्या 13 लाख 48 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखांहून जास्त आहे.
  4. न्यूझीलंड सरकारनं दुसऱ्यांदा आणीबाणीचा काळ वाढवलाय. अजून पुढचे 7 दिवस न्यूझीलंडमध्ये आणीबाणी असणार आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यांना अजून थोडी उसंत मिळायला हवी. त्यामुळे आणीबाणी वाढवण्यात येत असल्याचं न्यूझीलंडच्या सरकारनं म्हटलंय. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1160 इतकी आहे.
  5. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आता अतिदक्षता विभागात हलवण्यात आलंय. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते काही काळ क्वारंटाईन होते. मात्र प्रकृतीत सुधारण होत नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात भर्ती करण्यात आलंय. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री देशाचा सर्व कारभार सांभाळत आहेत. दरम्यान, ब्रिटनमध्ये याआधीच आरोग्यमंत्री आणि प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झालीय. देशात एकूण 51 हजारांहून अधिक लोकांना कोरोना झालाय.
  6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रशियानं भारतीय अंतराळवीरांचं ट्रेनिंग थांबवलं आहे. भारतीय वायुसेनेचे 4 पायलट रशियात ट्रेनिंग घेत होते. मात्र कोरोनामुळे मॉस्कोसह रशियातील अनेक शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे स्पेस ट्रेनिंग सेंटरही रशियाला बंद करावं लागलंय. 2021 पर्यंत भारत गगनयान मिशन लाँच करणार होता. मात्र कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रशियात आतापर्यंत 6343 लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत.
  7. उपकरणं कमी असल्यामुळे पाकिस्तानात डॉक्टरांनी प्रदर्शन केलंय. मात्र त्यापैकी अनेक डॉक्टरांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अनेकांना अटकही केली गेली. बलुचिस्थान प्रांतातल्या क्वेटामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी डॉक्टरांवर केलेल्या लाठीचार्जमुळे तिथल्या डॉक्टर संघटनांनी निषेध नोंदवला आहे. संचारबंदीचं उल्लंघन करुन डॉक्टर निदर्शनासाठी एकत्र जमल्यामुळे कारवाई करावी लागली, असं पोलिसांनी म्हटलंय. पाकिस्तानात सध्या 3800 कोरोनारुग्ण आहेत.
  8. युरोपात स्पेन या देशात आता सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. इटलीला मागे टाकून कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत स्पेन दुसऱ्या स्थानावर गेलाय. तिथं आतापर्यंत 1 लाख 36 हजार कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 40 हजार रुग्ण कोरोनापासून पूर्णतः बरे झाले आहेत. युरोपात पहिल्यांदाच इटलीला मागे टाकून स्पेन पुढे गेलाय. मात्र सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत पहिल्या 5 देशांपैकी 4 देश हे युरोपातले आहेत.
  9. इटलीत पुन्हा 24 तासात 636 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृतांची संख्या रोखणं इटलीपुढचं आव्हान बनलंय. इटलीत आतापर्यंत 1 लाख 32 हजार लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. 16 हजारांहून जास्त मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. 22 हजार लोक कोरोनापासून बरे सुद्धा झाले आहेत. 21 फेब्रुवारीला इटलीत पहिला कोरोनारुग्ण सापडला होता. तिथला लोम्बार्डी प्रांत हा इटलीतल्या कोरोनाचं केंद्र बनलाय.
  10. कोरोनाचा विषाणू हा सर्जिकल मास्कवर सुद्धा अनेक दिवस जीवंत राहू शकतो, असा अभ्यास समोर आला आहे. त्यामुळे सर्जिकल मास्क वापरताना त्याला स्पर्श न करणं, स्पर्श केला तर पुन्हा हात स्वच्छ धुणं अत्यंत गरजेचं आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी हा निष्कर्ष मांडलाय. वेगवेगळ्या पृष्टभागांवर किती वेळ कोरोना जीवंत राहू शकतो, याचा अभ्यास करण्यात आलाय. प्रिटिंग आणि टिश्यू पेपरवर 3 तासांपर्यंत कोरोनाचा विषाणू टिकतो. मात्र स्टील आणि प्लास्टिकवर 4 ते 7 दिवस कोरोना जीवंत राहू शकण्याची शक्यता आहे. दैनिक दिव्य मराठीनं ही बातमी प्रसिद्धे केलीय.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.