फरार विजय मल्ल्याकडे सापडली ‘ही’ अनमोल तलवार; लिलावमध्ये मिळालेली रक्कम तर पाहा…

नुकत्याच विकल्या गेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीवरही हा उल्लेख दिसून येतो. तलवारीवर कोरलेला मजकूर 2004 मध्ये मल्ल्याने खरेदी केलेल्या तलवारीसारखाच आहे.

फरार विजय मल्ल्याकडे सापडली 'ही' अनमोल तलवार; लिलावमध्ये मिळालेली  रक्कम तर पाहा...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 11:59 PM

नवी दिल्ली : इतिहासात प्रसिद्ध असलेल्या टिपू सुलतानच्या बेडचेंबर तलवारीचा लंडनमधील बोनहॅम्सने लिलाव केला आहे. हा लिलाव मंगळवारी हा झाला आला. मद्य व्यावसायिक म्हणून ओळख असलेला पण सध्या फरारी असलेला विजय मल्ल्या यांचे या तलवारीशी विशेष नाते होते. एक काळ होता की, जेव्हा ही तलवार विजय मल्ल्याच्या संग्रहात होती. मात्र, 2018 मध्ये लंडन उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याच्या वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले होते की, या तलवारीबाबत सध्या आमच्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

इतिहासकार आणि संशोधक निधी ओलिकारा यांनी माध्यमांबरोबर बोलताना सांगितले की, ही तलवार 2004 मध्ये विजय मल्ल्याने खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी मल्ल्याने ही तलवार दीड कोटींना खरेदी केली होती. आता तब्बल 19 वर्षांनंतर या तलवारीचा लिलाव करण्यात आला असून, ती 145 कोटींना विकली गेल्याचेही सांगण्यात आले आहे.

2016 मध्ये, 13 भारतीय बँकांच्या युनियनने लंडन उच्च न्यायालयाला विजय मल्ल्याच्या जागतिक मालमत्ता गोठवण्याचे आदेश जारी करण्याविरुद्ध प्रयत्न केले होते.

या प्रकरणी मल्ल्याने नंतर न्यायालयात सांगण्यात आले होते की, ही तलवार आपल्या कुटुंबासाठी दुर्दैव घेऊन आली होती, म्हणून ती दिली होती.

तर आता माध्यमांनी या तलवारीच्या पूर्वीच्या मालकांचा शोध घेण्यासाठी यूके लिलाव हाऊस बोनहॅम्सशी संपर्क साधला आहे.

तर त्यांनी सांगितले की, तलवारीच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या खरेदीदारांची ओळख आम्ही उघड करु शकत नाही. बोनहॅम्सच्या विक्री समन्वयक एनरिका मादुग्नो यांनी सांगितले की, ती विक्रेत्यांची ओळख उघड करू शकत नाही कारण ती त्यांच्या धोरणाविरोधात आहे.

विजय मल्ल्या यांनी खरेदी केलेली तलवार आणि मंगळवारी लिलाव करण्यात आलेल्या तलवारीवर एकच शिलालेख लिहिलेला होता. ही तलवार मेजर जनरल बैरतुद यांनाही भेट म्हणून देण्यात आली होती, त्यावर शमशीर ए मलिक असे लिहिले होते.

नुकत्याच विकल्या गेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीवरही हा उल्लेख दिसून येतो. तलवारीवर कोरलेला मजकूर 2004 मध्ये मल्ल्याने खरेदी केलेल्या तलवारीसारखाच आहे.

मेजर जनरल बेयर्ड यांनी 4 मे 1799 रोजी सेरिंगपटमवरील हल्ल्यादरम्यान सैन्याचे नेतृत्व केले होते. त्यामध्ये टिपू सुलतान मारला गेला होता.

त्यानंतर ब्रिटीश सैन्याने श्रीरंगपटना ताब्यात घेतले होते. यानंतर टिपूच्या पलंगाची खोली पाहण्यात आली त्यावेळी ही तलवार तेथे आढळून आली होती. त्यानंतर ही तलवार मेजर जनरल बेयर्ड यांना देण्यात आली.

तलवारीवर लिहिलेले की, शमशीर ए मलिक, याचा अर्थ आहे ही राजाची तलवार. त्याखाली लिहिले आहे की, या अल्लाह! या नासिर! या फतेह! या नासिर! या मुईन! या जहीर! ऐ अल्लाह! ऐ मददगार! ऐ सदाबहार! ऐ ऐडर! ऐ सहायक! ऐ एविडेंट! अशी अक्षरं त्यावर कोरलेली दिसून आली आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.