Billionaire James Crown : वय 70, थरार रेसिंगचा, वाढदिवस ठरला अखेरचा, काळाने घातली या अब्जाधीशावर झडप

Billionaire James Crown : 70 व्या वर्षी वाढदिवशी केलेलं थ्रील, अमेरिकन अब्जाधीशाच्या चांगलेच अंगलट आले. रेसिंग दुर्घटनेत या गर्भश्रीमंताला प्राणास मुकावे लागले.

Billionaire James Crown : वय 70, थरार रेसिंगचा, वाढदिवस ठरला अखेरचा, काळाने घातली या अब्जाधीशावर झडप
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये शाही मेजवाणीचे (State Dinner) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी, आनंद महिंद्रासह अनेक भारतीय श्रीमंत, अमेरिकेतील गर्भश्रीमंतांनी हजेरी लावली होती. यामध्ये त्यांना थेट भारतीय पंतप्रधानांशी संवाद साधता आला. या कार्यक्रमाला अमेरिकन अब्जाधीश जेम्स क्राऊन यांनी पण हजेरी लावली होती. 70 व्या वाढदिवशी केलेलं थ्रील, त्यांच्या चांगलंच अंगलट आलं. कार रेसिंग दुर्घटनेत या गर्भश्रीमंताला प्राणाला मुकावे लागले. हा वाढदिवस त्यांचा अखेरचा ठरला.

कारवरील नियंत्रण सुटले सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अब्जाधीश आणि मोठे गुंतवणूकदार जेम्स क्राऊन हे कार रेसिंगचा थरार अनुभवत होते. वय जरी 70 असले तरी तरुणालाही लाजवेल अशी चपळता त्यांच्यात होती. हा अति आत्मविश्वासच त्यांना नडला. कार रेसिंग दरम्यान त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रेसिंग ट्रॅकच्या दुतर्फा लावलेल्या बॅरिकेट्सला कार धडकली. त्यातच त्यांचा क्राऊन गतप्राण झाले.

जन्मदिवस ठरला अखेरचा वाढदिवशीची ही दुर्घटना झाली. जेम्स क्राऊन त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत होते. शिकागोमधील श्रीमंतांपैकी त्यांचे कुटुंब आहे. त्यांनी जेपी मॉर्गनमध्ये पण संचालक मंडळात काम केले होते. 1990 च्या दशकात त्यांनी जेपी मॉर्गन ग्रुपमध्ये काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

वुडी क्रीकमध्ये दुर्घटना कोलोराडो सनच्या वृत्तानुसार, ही घटना वुडी क्रीकमध्ये घडली. एस्पेन मोटार स्पोर्टस पार्कमध्ये ही दुर्घटना घडली. जेम्स क्राऊन हे कार चालवत होते. त्यांनी वाऱ्याशी स्पर्धा केली. कार अतिवेगात होती. त्यांचे एकाएकी या कारवरील नियंत्रण हरवले. या घटनेत त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे स्थानिक वृत्तात म्हटले आहे.

इतक्या संपत्तीचे धनी 2020 मधील अहवालानुसार, जेम्स यांची एकूण संपत्ती जवळपास 10.20 अब्ज डॉलर होती. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वाढदिवशीच काळाने घाला घातल्याने कुटुंबियांना शोक आवरणे कठिण झाल्याचे स्थानिक वृत्तात म्हटले आहे.

मोदींच्या कार्यक्रमात हजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये शाही मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी, आनंद महिंद्रासह अनेक भारतीय श्रीमंत, अमेरिकेतील गर्भश्रीमंतांनी हजेरी लावली होती. यामध्ये त्यांना थेट भारतीय पंतप्रधानांशी संवाद साधता आला. या कार्यक्रमाला अमेरिकन अब्जाधीश जेम्स क्राऊन यांनी पण हजेरी लावली होती.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.