World News Bulletin: इंडोनेशियात चर्चबाहेर आत्मघातक हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या

रविवारी (28 मार्च) जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातील 5 मोठ्या बातम्यांचा आढावा.

World News Bulletin: इंडोनेशियात चर्चबाहेर आत्मघातक हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 12:10 AM

Latest World News : रविवारी (28 मार्च) जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. म्यानमारच्या सैन्याने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर (Myanmar Protests) आकाशातून बॉम्ब टाकलेत. तसेच अंत्ययात्रेतील लोकांवरही गोळीबार केलाय. याशिवाय सुएझ कालव्यातील जहाजामुळे (Suez Canal Blockage) अडकलेला सागरी मार्ग, इंडोनेशियात चर्च बाहेर (Suicide Bombing in Indonesia) झालेला आत्मघातक हल्ला, चीनच्या कुरापती (China Philippines Dispute) अशा महत्त्वाच्या घडामोडींची माहिती घेणंही आवश्यक आहे (Top 5 World News 28 March 2021 Myanmar Protests Suez Canal Blockage) .

1. म्यानमारमध्ये सैन्याने आपल्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. देशात लोकशाही पुन्हा आणावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर सैन्याने थेट बॉम्ब हल्ले केलेत. यात जवळपास 114 लोकांचा जीव गेलाय. दुसरीकडे एका अंत्ययात्रेवरही गोळीबार करण्यात आलाय.

2. सुएझ कालव्यातील सागरी मार्ग आज 6 व्या दिवशीही बंदच राहिलाय. त्यामुळे सुएझ कालव्यातून युरोपकडे जाण्यासाठी आणि युरोपमधून आशिया खंडात येण्यासाठी शेकडो जहाजं रांगेत उभी आहेत. त्यामुळे कोट्यावधींचा जागतिक व्यापार ठप्प आहे. सध्या तरी अडकलेलं जहाज मार्गातून काढण्याचे सर्व उपाय उपयशी ठरले आहेत.

3. इंडोनेशियातील मकास्सर शहरात एका चर्चबाहेर आत्मघातकी हल्ला झालाय. यात अनेक लोक गंभीर जखमी झालेत. विशेष म्हणजे रविवार असल्याने चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

4. चीन आणि फिलिपीन्समधील तणाव वाढतच आहे. चीनने दक्षिण चीन महासागरातील वादग्रस्त भागात अनेक दिवसांपासून आपले 200 पेक्षा अधिक जहाजं तैनात केले आहेत. दुसरीकडे फिलिपीन्सने देखील या भागावर आपला दावा केलाय. तसेच चीनच्या जहाजांच्या तैनातीला उत्तर देत थेट लढाऊ विमानं तैनात केली आहेत.

5. पाकिस्तानमध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे इम्रान सरकारची कोंडी झालीय. त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘लैंगिक अत्याचार विरोधी दलाची’ स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा :

म्यानमार 114 आंदोलकांची हत्या, अंतिम संस्कारावेळीही सैन्याचा गोळीबार

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ला, संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना

Suez canal: भारतीय चालकाची चूक भोवली अन् ते अवाढव्य जहाज कालव्यात रुतलं?

व्हिडीओ पाहा :

Top 5 World News 28 March 2021 Myanmar Protests Suez Canal Blockage

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.