Train accident : हजारा एक्सप्रेसचे दहा डबे घसरले; 20 जणांचा मृत्यू, 50 प्रवासी जखमी

ट्रेनचे किती डबे खाली उतरले याची अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांकडून किती जण मृत्यूमुखी पडले, याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Train accident : हजारा एक्सप्रेसचे दहा डबे घसरले; 20 जणांचा मृत्यू, 50 प्रवासी जखमी
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 8:15 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानात आज दुपारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रावलपिंडीला जाणारी एक्सप्रेस ट्रॅकवरून खाली उतरली. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चालकाने उशिरा ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. शहजादपूर आणि नवाबशाह या स्थानकांदरम्यान सरहरी रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. ही हजारा एक्सप्रेस रावलपिंडीला जात असताना तिच्या दहा बोग्या रुळावरून घसरल्या. यामुळे सुमारे ५० रेल्वे प्रवासी जखमी झाले. तर २० जणांचा मृत्यू झाला. जखमींना नवाबशाह येथील पिपल्स मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कराचीवरून रावलपिंडीला जात होती एक्सप्रेस

ही ट्रेन कराचीवरून रावलपिंडीला जात होती. सुरक्षा दल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. ही ट्रेन पुलाजवळ ट्रॅकवरून खाली उतरल्याचे दिसत आहे. प्रवासी स्वतः बाहेर निघाले. पुलाच्या खाली काही मृतदेह पडले होते.

दहा डबे ट्रॅकखाली उतरले

पाकिस्तान रेल्वेचे डीसीओ मोहसीन सियाल यांनी सांगितलं की, ट्रेनचे किती डबे खाली उतरले याची अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांकडून किती जण मृत्यूमुखी पडले, याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सियान यांनी माध्यमांना सांगितले की, काहींच्या मते पाच डबे ट्रॅकखाली उतरले, तर काही जणांच्या मते दहा डबे ट्रॅकखाली उतरले.

मदतीसाठी सुरक्षा टीम दाखल

सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश नबावशाहचे उपायुक्त यांनी दिले. मृतक आणि जखमींच्या मदतीसाठी सुरक्षा चमूची गरज आहे. ही मोठी दुर्घटना असल्याचं शहीद बेंजाराबादचे पोलीस उपनिरीक्षक मुहम्मद सुनीस चांडियो यांनी म्हंटलं.

अपघाताचा व्हिडीओ समोर

या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रवासी बोगीतून स्वतः बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. रेल्वे अपघातानंतर बोगीतील प्रवासी प्रचंड घाबरले. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केली. पुलावर उलटलेल्या बोगीचे छत नष्ट झाले होते. काही मृतदेह बोगीखाली पडले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.