भरधाव ट्रकने 16 जणांना चिरडले; मदत कार्य करणाऱ्यांवरच बस कोसळली; दोन्ही अपघातात 32 जणांचा मृत्यू

दक्षिण-पूर्व तुर्कस्तानमध्ये शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 32 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मार्डिनमध्ये एका वेगात आलेल्या ट्रकने 16 जणांना चिरडल्याने 16 जण जागीच ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत, हा अपघात गझियानटेपमध्ये झाला आहे.

भरधाव ट्रकने 16 जणांना चिरडले; मदत कार्य करणाऱ्यांवरच बस कोसळली; दोन्ही अपघातात 32 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 8:53 AM

मार्डिनः तुर्कस्थानमध्ये (Turkey) दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामुळे मोठी खबळबळ माजली आहे. या अपघातांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला असून 52 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जो पहिला अपघात झाला आहे तो गझियानटेप (Gaziantep) येथे घडला असून प्रवाशी भरलेल्या बसचा हा अपघात झाला आहे. त्या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळी, दुसरा अपघात हा मार्डिन शहरात झाला असून ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटून अनेक लोकांना या ट्रकने (Truck Accident) चिरडले, या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही अपघातात अनेक जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भरधाव ट्रकने 32 जणांना चिरडून ठार केल्याने अनेक जणांना हा धक्का बसला आहे.

वेगवेगळे दोन अपघात

गझियानटेपचे प्रादेशिक गव्हर्नर दावूत गुल यांनी अपघाताविषयी सांगताना ते म्हणाले की, रस्त्यावरुन खाली दरीत एक बस कोसळल्याने आपत्कालीन कर्मचारी आणि पत्रकारांसह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जेव्हा अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि इतर मदतनीस अपघाताच्या ठिकाणी मदत करत होते, त्याचवेळी दुसरी बस 200 मीटर मागे कोसळली. त्यामुळे मदत करणासाठी खाली थांबलेल्या मदतकार्याच्या टीमचे सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

अनेक जण गंभीर

बस अपघात झाला त्याच वेली मार्डिनपासून 250 किमीवर एका ब्रेक फेल झालेला ट्रक गर्दीच्या ठिकाणी घुसल्याने 16 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी या अपघाताविषयी बोलताना सांगितले की,दुसऱ्या अपघातात 29 जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.