तुर्कीला भूकंपाचे पुन्हा हादरे; नागरिक पुन्हा भयभीत; तीव्रता 6.4…
पुन्हा एकदा तुर्की हादरले असून 6.4 रिश्टर स्केलमुळे जोरदार हादरे बसले आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. मनुष्यहानी आणि मालमत्तेचे कोण कोणते नुकसान झाले आहे की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.
नवी दिल्लीः तुर्कीला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आह. यावेळी 6.4 रिश्टर स्केलचा हादरा बसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हताया प्रांतात जोरदारपणे हे हादरे जाणवले आहेत. 7.4 महाविनाशकारी भूकंपानंतर तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सगळीकडे अनगोंदी माजल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भूकंपामध्ये किती नुकसान झाले त्याची अद्याप माहिती स्पष्ट झाली नाही. दोन आठवड्यांपूर्वी, तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जोरदार हादरे बसले होते. त्यामध्ये 45 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
आता पुन्हा एकदा तुर्की हादरले असून 6.4 रिश्टर स्केलमुळे जोरदार हादरे बसले आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. मनुष्यहानी आणि मालमत्तेचे कोण कोणते नुकसान झाले आहे की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.
मात्र लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वीच्या भूकंपातून अद्याप सावरले नसतानाच आता त्यांना पुन्हा एकदा याची भीती वाटू लागली आहे.
तुर्कीमधील भूकंपाचा पहिला धक्का हा 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 4.17 वाजता झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा दक्षिणेकडील तुर्कीमध्ये गजीन्टेप होता. त्या भूकंपाच्या हादरेतून सावरतात न सावरतात तेच आता आणखी हादरे बसले आहेत.
यानंतर 6.5 विशालतेचा आणखी एक धक्का बसला होता. या भूकंपामध्ये मालताया, सुनिल्यूरफा, उस्मानिये आणि दियारबाकीर यांच्यासह 11 प्रांतांमध्ये जोरदार हादरे बसले होते. संध्याकाळी 4 वाजता, एक भूकंप आणि त्यानंतर चौथा हादरा बसला होता.
याआधीच्या भूकंपाच्या धक्क्यातून लोकं सावरतात न् सावरतात तेच पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.