Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक
ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट 'टीम ट्रम्प' अस्थायी स्वरुपात ब्लॉक करण्यात आलेय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांच्या मुलाची वैयक्तिक माहिती ट्विट करण्यात आली होती. (Twitter blocked Donald Trump Campaign Account )
नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरादार झटका दिला आहे. ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट ‘टीम ट्रम्प’ अस्थायी स्वरुपात ब्लॉक करण्यात आलेय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांच्या मुलाची वैयक्तिक माहिती ट्विट करण्यात आली होती. त्यानंतर ट्विटरनं ट्रम्प यांच्या प्रचाराचं अकाऊंट ब्लॉक केले. (Twitter blocked Donald Trump Campaign Account)
ट्रम्प यांच्या प्रचाराचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर टीका केली आहे. टीम ट्विटर अकाऊंट वरील कारवाईनंतर ट्विटरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं लोकांनी ट्विटरबद्दल रोषदेखील व्यक्त केला.
टीम ट्रम्प अकाऊंटवर करण्यात आलेले ट्विट
We are back and we are re-posting the video Twitter doesn’t want you to watch.
JOE BIDEN IS A LIAR WHO HAS BEEN RIPPING OFF OUR COUNTRY FOR YEARS!
PASS IT ON. pic.twitter.com/pSWyycFrEF
— Team Trump (Text VOTE to 88022) (@TeamTrump) October 15, 2020
एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती शेअर करणं ट्विटरच्या नियमांविरोधात आहे. जर ट्रम्पना ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंटवर पोस्ट करायच्या असतील तर तो व्हिडीओ डिलीट करावा लागेल, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली.
Twitter has suspended @TeamTrump for posting a video calling Joe Biden a liar who has been ripping off our country for years, as it relates to the @nypost article.
19 days out from the election. pic.twitter.com/Z9FFzridyr
— Mike Hahn (@mikehahn_) October 15, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांच्या @TeamTrump या ट्विटरवर जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडनच्या युक्रेनमधील व्यवसायाबद्दल माहितीबद्दल देणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओसोबत ‘जो बायडन खोटे आहेत आणि ते कित्येक वर्षापासून देशाला धोका देत आहेत’ असे कॅप्शन दिलेले होते.
टीम ट्रम्पकडून संबंधित व्हिडीओ पहिल्यांदा डिलीट करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळी ट्विट करण्यात आला. हा व्हिडीओ आम्ही पुन्हा पोस्ट करत आहोत जो ट्विटर तुम्हाला दाखवू इच्छित नाही, असं कॅप्शन दिले होते.
जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका
दरम्यान, सकाळी 6 च्या दरम्यान अनेक ट्विटर युजर्सला ट्विट करताना अडचणी होत होत्या. कोणतेही ट्वीट करताना Try आणि ‘Something Went Wrong’ असे मॅसेज दिसत होते. यामुळे ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या युजर्सना ट्वीट करता येत नव्हते. तसेच काहींना ट्वीट रिट्वीट करण्यातही अडचणी येत होत्या. यामुळे जगभरातील अनेक देशात #TwitterDown हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.
संबंधित बातम्या :
Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका
मोदींच्या मैत्रीचा फायदा नाहीच, ट्रम्प यांना अमेरिकेतील केवळ 22 टक्के भारतीयांचा पाठिंबा : सर्व्हे
(Twitter blocked Donald Trump Campaign Account)