ब्रिटनमध्ये दोन भारतीय युवकांचा बुडून मृत्यू; दोघंही केरळमधील असल्याचे स्पष्ट
भारतीय युवकांचा मृत्यू झाला असून दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. स्थानिक नगरसेवक रॅचेल फर्ग्युसन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून कौन्सिलर फर्ग्युसन यांनी ट्विट केले आहे. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
नवी दिल्लीः उत्तर आयर्लंडमधील (North Ireland) तलावात पोहायला गेलेल्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या दोन भारतीय मुलांचा बुडून मृत्यू (death by drowning) झाला आहे. तेथील स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली असून ते मूळचे केरळचे आहेत. ब्रिटनमध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोन भारतीय मुलांची नावं ही जोसेफ सेबॅस्टियन आणि रुवेन सायमन अशी आहेत.सोमवारी सुट्टी असल्याने डेरी/लंडोन्डरी शहरातील (Derry/Londonderry) तलावावर ते दोघे आपल्या मित्रांसववेत गेले होते. त्यानंतर सगळ्या मित्रांनी पोहण्याचे नियोजन केले, त्यानंतर ते सगळेजण पोहण्यासाठी तलावात उतरले होते. 16 वर्षाचे असलेले दोघेही तलावामध्ये पोहत असताना त्यांना तलावातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना बाहेर काढले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या दोघा भारतीयांचा मृत्यू झाल्याचे समजताच केरळ असोसिएशनकडून या दोघांना मंगळवारी उत्तर आयर्लंडमधील डेरी/लंडनडेरी शहरातील मुलांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तलावात दोघंही बुडाले
पोहण्यासाठी दोघेही पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते दोघेही एकामागोमाग एक बुडाले. त्यानंतर तिथे उपस्थित असेल्या नागरिकांनी दोघांनाही बाहेर काढले, त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही पाण्यातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
इंघ लॉफ तलावात दुर्घटना
भारतीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने असोसिएशनच्या प्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, “आमच्या दोन तरुणांच्या, रुवेन सायमन आणि जोसेफ सेबॅस्टियनच्या इंघ लॉफ येथे या मुलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर आयर्लंड पोलीस सर्व्हिस (पीएसएआय) ने या घटनेबाबत एक निवेदन जाहीर करुन या दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले.
स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केला शोक
भारतीय युवकांचा मृत्यू झाला असून दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. स्थानिक नगरसेवक रॅचेल फर्ग्युसन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून कौन्सिलर फर्ग्युसन यांनी ट्विट केले आहे. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे, या दुःखद प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही घटना घडल्यानंतर मुलांचा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार.