ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या प्रेमकहाणीही आहे हळूवारपणाची..; म्हणूनच त्यांचे असं थेट नातं आहे भारतीयांबरोबर

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती ऋषी सुनकबद्दल बोलताना म्हणतात, त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी त्यांची चमक दाखवली होती.

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या प्रेमकहाणीही आहे हळूवारपणाची..; म्हणूनच त्यांचे असं थेट नातं आहे भारतीयांबरोबर
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:17 PM

नवी दिल्लीः ब्रिटनचे नवे पंतप्रधान आता ऋषी सुनक (rishi sunak)असणार आहेत. ब्रिटिश सरकारमध्ये एवढ्या मोठ्या पदावर जाणारे ते भारतीय वंशाची ही पहिलीच व्यक्ती ठरणार आहे. पंतप्रधानपदासाठी निवड झाल्यानंतर त्यांचे सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murti) यांनी आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता (Akshta) आणि सुनक यांची पहिली भेट अमेरिकेत झाली होती.

द संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनक यांनी त्यांच्या प्रेमकथेतील एक किस्सा शेअर केला आहे. त्यांची प्रेमकथा कधी, कशी आणि कुठे सुरु झाली होती ते त्यांनी सांगितले होते.

ऋषी सुनक सांगतात की, त्यांची आणि अक्षताची पहिली भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली होती. या दोघांनीही तेथूनच एमबीएचे शिक्षण घेतल होते.

या दोघांनी एकत्रच शिक्षण घेतले असले तरी दोघांच्या स्वभावात मात्र खूप मोठा फरक होता. तरीही कॉलेजमध् या दोघांचे नाते जुळले आणि प्रेमकहाणीला सुरुवात झाली.

सुनकला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी तेथील शिक्षणाला सुरुवात केली होती. दोघांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर अभ्यासादरम्यान दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी अक्षताने आपले वडील नारायणमूर्ती यांना सुनकशी लग्न करण्यासाठी काही गोष्टी सांगून तयार केले होते.

सुनकबद्दल त्यांचे सासरे नारायण मूर्ती सांगतात की, जेव्हा मी सुनकला पहिल्यांदा भेटलो होतो, त्याचवेळी त्याचं ध्येय मला त्याच्या दिसत होते. तो हुशार आणि प्रामाणिक होता. त्यामुळे माझी मुलगी अक्षताचे त्याने मन जिंकले होते असंही ते म्हणतात. ही आठवण त्यांनी एका पुस्तकातही सांगितली आहे.

यूकेतील साऊथम्प्टन येथे 12 मे 1980 रोजी जन्मलेले ऋषी सुनक यॉर्कशायरचे खासदार आहेत. त्यांचे आजोबा ब्रिटिशकालीन पंजाबमधील होते.

वडील यशवीर सुनक यांचा जन्म केनियात झाला आणि आई उषा सुनक टांझानियाची. वडील व्यवसायाने राष्ट्रीय आरोग्य सेवेत जनरल प्रॅक्टिशनर आहेत आणि आई दवाखाना चालवत होती.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.