AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशवासियांना पॉर्न दाखवून रशियाविरोधात युद्ध लढणार; जेलेन्स्की यांची नवीन ट्रिक; जगही बुचकाळ्यात

युक्रेन रशियाविरोधातील युद्धासाठी नवीन रणनीती आखत आहे. युद्धनिधी गोळा करण्याकरिता पॉर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. खासदारांच्या अंदाजानुसार, यातून सरकारला २५ दशलक्ष डॉलरचा महसूल मिळू शकतो, ज्यातून ३० हजार ड्रोन खरेदी करता येतील. सध्या बेकायदेशीर असलेल्या या उद्योगाला कायदेशीर करून टॅक्सद्वारे युद्धाला आर्थिक बळ देण्याचा हा प्रयत्न आहे.

देशवासियांना पॉर्न दाखवून रशियाविरोधात युद्ध लढणार; जेलेन्स्की यांची नवीन ट्रिक; जगही बुचकाळ्यात
Volodymyr ZelenskyyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 1:25 PM
Share

रशियाच्या विरोधात युद्ध लढताना यूक्रेन आता नवीन ट्रिक लढवणार आहे. यूक्रेनमध्ये पोर्नोग्राफी कायद्याला कायद्याने वैधता देण्याचा प्रस्ताव आला आहे. यूक्रेनचे खासदार यारोस्लाव जेलेजयनियाक यांचा पाठिंबा असलेलं एक विधेयक एडल्ट एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला कायदेशीर अर्थव्यवस्थेचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जेलेजनियाक हे यूक्रेनी संसदेच्या वित्त समितीचे अध्यक्ष आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, जेलेजनियाक यांच्या अंदाजानुसार पोर्नोग्राफिक कायदा बनवल्यावर सरकारला टॅक्सच्या रुपात सुमारे 25 मिलियन डॉलर म्हणजे 2.5 कोटी डॉलरचे उत्पन्न होऊ शकते. या रकमेतून युद्धासाठी 30 हजार ड्रोन खरेदी करता येईल. हे ड्रोन युद्धासाठी पुरेशे ठरतील. त्यामुळेच जेलेजनियाक यांनी हा आश्चर्यकारक प्रस्ताव संसदेसमोर आणला आहे.

आता कायद्याने बंदी

यूक्रेनमध्ये सध्या पोर्नोग्राफी बनवणं, व्हिडीओ ठेवणं किंवा ते व्हायरल करणं कायद्याने बंदी आहे. त्यासाठी सात वर्षाची शिक्षा आहे. मात्र, असं असलं तरी यूक्रेनमधील एडल्ट कंटेट इंडस्ट्री वाढतच आहे. याला काही भ्रष्टाचारी पोलिसांचं पाठबळ असल्याचं एका रिपोर्टचा दावा आहे.

आता टॅक्स अधिकाऱ्यांनी एडल्ट कंटेट क्रिएटर्सकडून टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आता या निमित्ताने एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जे क्रिएटर्स आपली कमाई घोषित करत आहेत, ते लोक स्वत: अशा प्रकारच्या गोष्टीची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. अर्थात हा कायद्याने गुन्हा आहे. जेलेजनियाक यांनी याला ट्रेजिकॉमिक स्थिती म्हटलं आहे. त्यांच्या मते, या परिस्थितीमुळे महिला दुहेरी संकटात सापडल्या आहेत. टॅक्स नाही दिला तर गुन्हेगारी कारवाई होण्याची भीती आहे, तर टॅक्स दिल्यावर पोर्नोग्राफिक कायद्यानुसार कारवाई होण्याचा धोका आहे, असं जेलेजनियाक यांनी म्हटलं आहे.

OnlyFans द्वारे कोट्यवधीची कमाई

ओन्ली फॅन्स या प्लॅटफॉर्मची पॅरंट कंपनी फेनिक्स इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार, 2023मध्ये 7,900 यूक्रेनियीन नागरिकांनी OnlyFans द्वारे 131 मिलियन डॉलरहून अधिक कमाई केल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. टॅक्स अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर काही क्रिएटर्सना टॅक्स चोरी आणि अवैध एडल्ट कंटटे बनविण्याच्या आरोपात नोटीस मिळाली आहे. OnlyFans क्रिएटर स्वितलाना ड्वोर्निकोवाच्या दाव्यानुसार, पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारून 20 हजार डॉलर रोख रक्कमसोबतच लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्ह जप्त केले आहेत. पोलिसांनी केस संपवण्यासाठी लाच मागितली होती. पण आपण लाच देण्यास नकार दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

राष्ट्रपतींच्या वेबसाईटवर प्रकरण

टॅक्स वकील लेसिया मिखालेंको यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. युद्धाच्या काळात क्रिएटर्सवर खटला चालवणे हा सरकारी संसाधनांचा योग्य वापर नाहीये, असं लेसिया म्हणाल्या. तर ड्वोर्निकोवा यांनी राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की यांच्या वेबसाईटवर याचिका दाखल करून आपण इमानदार टॅक्सपेअर असल्याचा दावा केला. आपण सुमारे 9 लाख डॉलर्सचा टॅक्स भरल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रिपोर्टनुसार, याचिकेवर एका आठवड्याच्या आत 25 हजाराहून अधिक स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर जेलेन्स्की यांनी खासदार जेलेजनियाक यांच्या पोर्नोग्राफीचा कायदा बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करेल. हे विधेयक जुलैमध्ये पहिल्या रिडिंगमध्ये मंजूर झालं आहे. आता दुसऱ्या रिडिंगच्या प्रतिक्षेत आहे.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?