Russia-Ukrain War | HIMRAS चा कहर, पुतिन यांना दणका, एका झटक्यात रशियाचे 100 सैनिक ठार?

Russia-Ukrain War | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एकदिवस आधी युक्रेनमध्ये सैन्य अभियानात यश मिळाल्याचा दावा केला होता. यानंतर युक्रेनने घातक प्रहार केलाय. आता रशियाकडून यापेक्षाही भयानक उत्तर दिलं जाऊ शकतं. कारण रशियन सैन्याच मोठ नुकसान झालय.

Russia-Ukrain War | HIMRAS चा कहर, पुतिन यांना दणका, एका झटक्यात रशियाचे 100 सैनिक ठार?
Russia-Ukrain War
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 8:47 AM

Russia-Ukrain War | रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध अजून संपलेलं नाहीय. रशियाने युक्रेनचा बराचसा भूभाग जिंकला आहे. पण अजूनही युक्रेन अमेरिका आणि नाटो देशांकडून मिळणाऱ्या मदतीवर रशियाशी लढत आहे. युक्रेनची हार होत असली, तरी मागच्या दोन दिवसात युक्रेनने रशियाला चांगलाच दणका दिला आहे. अमेरिकी आर्टिलरी रॉकेट सिस्टम HIMARS मुळे हे शक्य झालय. या रॉकेट लाँचरद्वारे युक्रेनने इतके घातक प्रहार केले की, दोन हल्ल्यात अनेक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला. याच्या एक दिवस आधी युक्रेनने एका बंकरवर हल्ला केला. त्यात एकाच झटक्यात रशियाच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाला. हे सैनिक परेडची तयारी करत असताना हा हल्ला झाला.

रशिया-युक्रेन युद्धामुळे बरच काही नष्ट झालय. पण अजून विद्धवंस संपण्याची चिन्ह नाहीयत. युक्रेनच्या क्षेत्रावर ताबा मिळवणाऱ्या रशियन सैन्यावर आता युक्रेनकडून घातक प्रहार केला जातोय. हे किती भयानक आहे, ते युक्रेनने जारी केलेल्या एका व्हिडिओमधून दिसून आलय. खेरसॉलमध्ये युद्धाभ्यास सुरु असताना युक्रेनने रशियन सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये रशियन सैनिक परेड करत असताना HIMARAS ने रशियन सैनिकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किती रशियन सैनिक ठार झाले, त्याचा अंदाज नाहीय. पण या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेलेत.

कुठे झाला हल्ला?

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एकदिवस आधी युक्रेनमध्ये सैन्य अभियानात यश मिळाल्याचा दावा केला होता. यानंतर युक्रेनने HIMARS ने हल्ला करुन अनेक रशियन सैनिकांना संपवलं. या हल्ल्यानंतर फोटो समोर आले. त्यात रशियाच्या ताब्यात असलेल्या डोनेट्स्क क्षेत्रातील ट्रुडिवस्केमध्ये सैन्य प्रशिक्षण स्थळावर मोठ्या प्रमाणात मृतदेह विखरुन पडलेले होते. शहीद सैनिक 36वीं गार्ड्स मोटराइज्ड राइफल ब्रिगेडच्या चौथ्या, 5व्या आणि 6व्या कंपनीचा भाग होते. ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, युक्रेनकडे पुतिनच्या सैन्याबद्दल गोपनीय माहिती होती.

युद्धक्षेत्रात परेडसाठी कोणी भाग पाडलं?

रशियाचे मेजर-जनरल मोइसेव पोहोचणार होते, त्याचवेळी हा हल्ला झाला असं रशियन सूत्रांनी सांगितलं. रशियन टेलिग्राम चॅनल्सनी जनरल मोइसेव यांच्यावर टीका केली. त्यांनीच युद्धक्षेत्रात रशियन सैनिकांना परेडसाठी भाग पाडलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.