Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीला निरोप देताना झाला भावुक! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाप-लेकीचा Emotional video viral

Russia Ukraine war : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. यातच एक इमोशनल (Emotional) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

लेकीला निरोप देताना झाला भावुक! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाप-लेकीचा Emotional video viral
रशिया युक्रेन युद्धादरम्यान व्हायरल झालेला बाप-लेकीचा भावुक क्षण
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:24 AM

Russia Ukraine war : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य करून हल्ले करत आहे. यासोबतच त्यांनी युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. गुरुवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी झालेल्या पहिल्या हल्ल्यापासून सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहेत. यातच एक इमोशनल (Emotional) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सर्व जाणतो, की युद्ध ही एक विद्ध्वंसकारी प्रक्रिया आहे. जिथे लोकांचे केवळ प्राण जाऊ शकतात. त्यातून कोणाचेही भले होत नसते. स्वतःचे प्राण वाचवणे आणि कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवणे हे यातील एक अवघड काम असते. रशिया-युक्रेन युद्ध आणि यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत. या वेळी वडील आणि मुलीचे डोळे पाणावले आहेत. @lil_whind नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, की युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाला अलविदा म्हणतो, तर तो रशियनांशी लढण्यासाठी मागे राहतो.’ यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘देव या पित्याचे आणि युक्रेनचे रक्षण करो.’

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी भावनिक कमेंट केल्या. एका यूझरने लिहिले, ‘देव या पित्याचे आणि युक्रेनचे रक्षण करो.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘देव या माणसाची त्याच्या कुटुंबाशी लवकरच भेट घडवून देवो.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे खरोखरच हृदयद्रावक आहे. याशिवाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

Russia Ukraine | व्लादिमीर पुतिन हे रशियन जेम्स बाँड आहेत की रशियाचे रजनीकांत? Viral होत आहेत भन्नाट Jokes

Russia-Ukraine War : कोण आहे ‘ही’ शस्त्रधारी युक्रेनी महिला? जीची सोशल मीडियावर सुरूये जोरदार चर्चा

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज, बायडेन यांना काय हवे?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.