Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : आम्हाला संरक्षण सामग्रीची मदत करा, रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती

रशियाच्या बरोबर बेलारुसनं देखील यूक्रेनवर हल्ला केला आहे. यूक्रेनचं सैन्य दल देखील रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी आता जागितक नेत्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

Russia Ukraine War : आम्हाला संरक्षण सामग्रीची मदत करा, रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती
यूक्रेन रशिया युद्ध
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 3:33 PM

नवी दिल्ली : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी यूक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशियाने याआधीच पूर्व युक्रेनमधील ‘डोनेस्तक’ आणि ‘लुहान्स्क’ येथे सैन्य पाठवले होते. यासोबतच रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या (Ukraine) सीमेजवळ तैनात केलं आहे.रशियानं यूक्रेनवर हल्ला केला आहे. रशियानं युद्धाची घोषणा करत यूक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केलीय. रशियानं हल्ला केल्यानंतर यूक्रेनमधील लोक देश सोडून पळू लागले आहेत. रशियाच्या बरोबर बेलारुसनं देखील यूक्रेनवर हल्ला केला आहे. यूक्रेनचं सैन्य दल देखील रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी आता जागितक नेत्यांकडे मदतीची विनंती केली आहे. झेलेन्स्की यांनी जागतिक नेत्यांनी संरक्षण सामग्रीची मदत करावी. आम्हाला यूक्रेनची एअरस्पेसचं रशियाच्या सैन्यापासून संरक्षण करायचं आहे. एपी प्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

पीटीआयचं ट्विट

रशियाकडून यूक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहेत. कीव शहरातील विमानतळावर देखील हल्ला करण्यात आला आहे. आता यूक्रेनेच वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी जागतिक पातळीवरील मोठ्या देशांकडे संरक्षण सामग्रीची मागणी केली आहे. यूक्रेनच्या एअरस्पेसचं संरक्षण करण्यासाठी मदतीची गरज असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

नाटोचे 30 देश रशियाला उत्तर देणार

रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो कडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. नाटोच्या 30 सदस्य देशांकडून रशियावर हल्ला केला जाणार आहे.

रशियन सैन्य कीव पासून 75 किमीवर

रशियाच्या सैन्यानं यूक्रेनच्या हवाई उड्डाण केंद्रांवर हल्ले सुरु केले आहेत. सैन्य दलाच्या ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. रशियानं बेलारुस मध्येही 30 हजार सैन्य तैनात केलं आहे. तेथून यूक्रेनची राजधानी कीव केवळ 75 किमी अंतरावर आहे. रशियानं राजधानीवर हल्ला करुन यूक्रेनपासून वेगळं पाडण्याचा उद्देश होता.

इतर बातम्या:

Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू

Russia Ukraine तणावात असताना सोशल मीडिया यूझर्सचं सुरूय भलतच काहीतरी…; युद्धावरही आलाय Memesचा महापूर!

राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...