israel hamas war | भुयारं आमच्या सुरक्षेसाठी, हमास नेता म्हणाला, ‘UN ने करावी गाझाच्या नागरिकांची सुरक्षा’

7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर नृशंस हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमासवर हल्ला केला आहे. साधारण महिनाभर हे युद्ध सुरु आहे. या हल्ल्यात आता इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीत उत्तर भागात शिरकाव केला आहे. हमासचे अतिरेक्यांनी भुयारांमध्ये आश्रय घेतला असल्याने त्यांना तेथून हुसकवण्याचे मोठे आव्हान इस्रायलपुढे असताना हमासच्या नेत्याने वेगळाच दावा केला आहे.

israel hamas war | भुयारं आमच्या सुरक्षेसाठी, हमास नेता म्हणाला, 'UN ने करावी गाझाच्या नागरिकांची सुरक्षा'
tunnel of gazapatti Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 8:18 PM

तेल अवीव | 31 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासचे युद्ध सुरु आहे. आतापर्यंत गाझापट्टीत हवाई हल्ले करणाऱ्या इस्रायलने आता तेथे मैदानी लढाई करण्याची तयारी सुरु केली आहे. या युद्धात आता गाझापट्टीतील भुयारी मार्गांचा अडथळा इस्रायलच्या समोर आवासून आहे. या दरम्यान, आता हमासच्या एका नेत्याने गाझापट्टीत असलेल्या भुयारांचा उपयोग हमासच्या लढवय्ये त्यांच्या सुरक्षेसाठी करणार असून गाझापट्टीतील नागरिकांची जबाबदारी आता संयुक्त राष्ट्रांनी पाहावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत आठ हजाराहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहीती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रशिया टीव्ही टूडे या चॅनला दिलेल्या एका मुलाखतीत हमासच्या मूसा अबू मरजूक यांनी सर्वसामान्य जनतेला वाचविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र आणि इस्रायलची आहे. मिडील ईस्ट मिडीया रिसर्ट इन्स्टिट्यूट म्हणजे Memri टीव्ही तर्फे केलेल्या अनुवादानूसार मूसा यांनी गाझाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी युएन आणि इस्रायल यांची असे म्हटले आहे. मूसा याने म्हटले आहे की आम्ही टार्गेट होण्यापासून संरक्षणासाठी आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ही भुयारे तयार केली आहेत. ती हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी आहेत. आमच्या जवळ भुयारातून लढण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचे मूसा याने मुलाखतीत म्हटले आहे. जिनिव्हा परिषदेतील करारानूसार जोपर्यंत ते कोणाच्या तावडीत आहेत, तोपर्यंत त्यांना सर्व सेवा आणि सुविधा पुरविण्याची जबाबदारी युएनची आहे.

उत्तर गाझाच्या आत पोहचले सैन्य

इस्रायली सैन्य आणि त्यांच्या चिलखती वाहनांनी सोमवारी उत्तर गाझापट्टीतील आतील भागात प्रवेश केला आहे. पॅलेस्टिनी भागात मैदानी कारवाई सुरु केल्याच्या तीन दिवसानंतर सोमवारी गाझापट्टीत दोन्ही बाजूंनी युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी गाझाच्या मुख्य उत्तर शहरावर पूर्व आणि पश्चिमेकडून हल्ला केला.

रुग्णालयाजवळ हल्ले

हॉस्पिटल आणि त्यांच्या शेजारी जेथे हजारो रुग्ण आणि नागरिकांनी आश्रय घेतला आहे तेथे इस्रायली सैनिक हल्ले करीत असल्याने संयुक्त राष्ट्र आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सावध राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचे सैन्य उत्तर गाझाच्या आतपर्यंत शिरले आहे. इस्रायल सैनिकांनी सोमवारी जारी केलेल्या व्हिडीओत चिलखती वाहने इमारतीच्या मधून जाताना दिसत आहेत. तसेच इस्रायली सैनिक काही घराच्या आता मोर्चा सांभाळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.