AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला?; दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास…

Who is Underworld Don Dawood Ibrahim : 15 टोपणनावं अन् करोडोंचा व्यायसाय; जाणून घ्या, पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला? दाऊद मूळचा कुठला? तो अंडरवर्ल्डमध्ये कसा आला? मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड दाऊदबाबतच्या अनटोल्ड स्टोरी, दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास... वाचा...

पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला?; दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
| Updated on: Dec 18, 2023 | 1:48 PM
Share

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : दाऊद इब्राहिम… भारताचा सर्वात मोठा दुश्मन… दाऊदवर विषप्रयोग केल्याची जगभर चर्चा सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याचीही माहिती आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करणारा, बॉम्बस्फोट घडवून निरापराध लोकांचे प्राण घेणारा दाऊद इब्राहिम नेमका कोण आहे? दाऊदचा जन्म कुठे झाला? एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला? त्याची लाईफस्टोरी काय आहे? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? विष प्रयोगानंतर तो नेमका कसा आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं अन् अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास, वाचा…

जन्म रत्नागिरीतील

दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीत 1955 साली झाला. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते. नंतर कासकर कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं. 70 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या जगात दाऊदचं नाव मोठं होऊ लागलं.  दाऊदचा भाऊ साबीर इब्राहिम कासकर याची 1981 ला हत्या झाली. त्यानंतर दाऊदच्या मनात जो राग निर्माण झाला त्यातूनच दाऊद मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन बनला. दाऊद आधी हाजी मस्तानच्या गँगमध्ये काम करत होता. तिथं त्याचा प्रभाव वाढू लागला. नंतर त्याच्या गँगला डी-कंपनी नावाने संबोधलं जाऊ लागलं.

…अन् दाऊद डॉन झाला!

दाऊद डी-कंपनीचा म्होरक्या होता. 90 च्या दशकात तर त्याची मुंबईत जबरदस्त दहशत होती. साल होतं, 1993 चं… दिवस होता 12 मार्चचा अन् स्थळ होतं देशाची आर्थिक राजधानी मुंबई… एकाच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. 11 ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमागे एका डॉनचं नाव होतं. तो डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम….

15 टोपणनावं अन् करोडोंचा व्यायसाय

दाऊद इब्राहिम हा मोस्ट वॉंडेट अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्याची 15 टोपणनावं आहेत. दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हामिद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन, दाऊद साबरी, कासकर दाऊद हसन, शेख मोहम्मद इस्माइल अब्दुल रहमान, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख इस्माइल अब्दुल आणि हिजरत ही दाऊदची टोपणनावं आहेत.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.