AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Army Helicopter crash : अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश, 4 सैनिक दगावले, कशी घडली दुर्घटना?

काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यातही सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यातही भारताने पायलट गमावले. अशीच एक घटना अमेरिकन सैन्यासोबत घडली. अमेरिकन सैन्याचं हेलिकॉप्टर नॉर्वेत क्रॅश (Us army helicopter crash in norway) झालंय.

US Army Helicopter crash : अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश, 4 सैनिक दगावले, कशी घडली दुर्घटना?
अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरला दुर्घटनाImage Credit source: boeing.com
| Updated on: Mar 19, 2022 | 4:01 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घनेने (Helicopter crash) भारताचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात भारताने सीडीएस बिपीन रावत यांच्यासारखे प्रमुख अधिकारी गमावले आहेत. काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यातही सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यातही भारताने पायलट गमावले. अशीच एक घटना अमेरिकन सैन्यासोबत घडली. अमेरिकन सैन्याचं हेलिकॉप्टर नॉर्वेत क्रॅश (Us army helicopter crash in norway) झालंय. यात चार सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. नाटोच्या सरावात भाग घेणारे अमेरिकन सागरी विमान नॉर्वेमध्ये क्रॅश झाले असून त्यात सर्व चार अमेरिकन लोक ठार (Four us soldier death) झाले आहेत, असे स्कॅन्डिनेव्हियन देशाच्या लष्कराने शनिवारी सांगितले. असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्यावरही सध्या शोककळा पसरली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

सरावादरम्यान घडली घटना

चार व्यक्तींचा क्रू कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सरावात भाग घेत होता ज्यात नाटो आणि सरकारी देशातील लोकांचा समावेश होता. त्यांचे विमान यूएस मरीन कॉर्प्सचे व्ही-22बी ऑस्प्रे विमान, उत्तर नॉर्वेमधील बोडोच्या दक्षिणेला शुक्रवारी संध्याकाळी बेपत्ता झाले. शनिवारी पोलीस घटनास्थळी पोहोचले. नॉर्डलँड काउंटीमधील पोलिसांनी आता याबाबत अधिकृत माहिती दिली आहे की चार जणांचा क्रू मरण पावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे चौघे अमेरिकन राष्ट्रीयत्वाचे आहेत असे एका निवेदनात म्हटले आहे.

सरावाबाबत स्पष्टीकरण

मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर रशिया आणि नाटो यांच्यातील तणाव वाढला आहे, परंतु 24 फेब्रुवारी रोजी हे आक्रमण सुरू होण्यापूर्वी हा सराव नियोजित होता असेही सांगण्यात आले आहे. परस्पर देशातील संबंध मजबूत करण्यासाठी हा सराव होता अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अजून या दोन्ही देशात पूर्ण शांतता प्रस्थापित झालेली नाही. त्यातच ही दुर्घटना घडल्याने संशयही व्यक्त केला जात आहे.

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

Nashik | जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन NCP मध्ये यावं, भुजबळांचं थेट आवतण

पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.