US Election 2020 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक मतमोजणीत अडथळा, हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब

संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर (US Election 2020) खिळून आहे.

US Election 2020 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक मतमोजणीत अडथळा, हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब
5. या कार्डाद्वारे अनुक्रमांक, भाग क्रमांक आणि सुरक्षित क्यूआर कोडही देण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 12:33 AM

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर (US Election 2020) खिळून आहे. मतमोजणी जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण झालीय. यात माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि आत्ताचे डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर आहेत. द वॉशिंग्टन पोस्टच्या आकडेवारीनुसार, 538 ‘इलेक्टोरल कॉलेज सीट’पैकी बायडन 227 जागांवर आणि ट्रम्प 213 इलेक्टोरल जागांवर आघाडीवर आहेत. दोघांनाही बहुमतासाठी 270 इलेक्टोरल मतं मिळवणं आवश्यक आहे. याच दरम्यान मतमोजणी सुरु असताना हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब झाल्याची घटना घडलीय (US Elections 2020 Ballot Scanner jam due to Hand Sanitiser in America).

अमेरिकेच्या आयोवा राज्यात एका ठिकाणी बॅलेट स्कॅनर मतमोजणी सुरु असतानाच बंद झालं. त्याचं कारण काहीसं वेगळं आहे. मतदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वापरलेल्या हँड सॅनिटायझरमुळे हे बॅलेट स्कॅनर जॅम झालं आहे. न्यू यॉर्क डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आयोवाच्या डेस मोयनेसमध्ये जवळपास 1 तासासाठी मशिन बंद ठेवण्यात आलं.

संबंधित मशिन जॅम झाल्यानंतर हँड सॅनिटायझर डिस्पेंसरला वेगळं ठेवण्यात आलं. यामुळे सॅनिटायझर मतमोजणीपर्यंत कोरडं होऊन बॅलटमध्ये जाणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे. बॅलेटमध्ये ओलावा असेल तर बॅलेट मशीन जॅम होण्याचा धोका अधिक आहे. अमेरिका कोरोनामुळे प्रभावित झालेला पहिल्या क्रमांकांचा देश झालाय. मार्चपासून आतापर्यंत आयोवामध्ये कोरोनाचे जवळपास 1 लाख 35 हजार रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, जॉन्स हॉपकिंसच्या कोरोना व्हायरस ट्रॅकरनुसार, कोरोनो विषाणूने आतापर्यंत 4.7 कोटी लोकांना संसर्ग केलाय. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 12 लाख लोकांचा मृत्यू झाले आहेत. अमेरिका कोरोनाच्या 93 लाख रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच मृतांच्या संख्येतही 2 लाख 32 हजार मृत्यूंसह अमेरिका सर्वात जास्त फटका बसणारा देश ठरला आहे.

संबंधित बातम्या :

US Election : ट्रम्प-बायडनमध्ये कोण जिंकणार? सनी लिओनी म्हणते ‘ही आतुरता माझा जीव घेतेय’

US Election 2020 : व्हाईट हाऊसजवळ आंदोलकांची गर्दी, ट्रम्प यांना जोरदार विरोध

US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

US Elections 2020 Ballot Scanner jam due to Hand Sanitiser in America

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.