‘माय लॉर्ड! मी एक नाही 16 खून केलेत’, कबुली जबाब ऐकून न्यायाधीशही अवाक, वाचा काय आहे प्रकरण?
'माय लॉर्ड, मी एक नाही, तर 16 खून केले आहेत', असा कबुली जबाब देताना तुम्ही आरोपीला ऐकलंय?
US Man Says He Killed 16 People Not One वॉशिंग्टन : अनेकदा न्यायालयात आरोपींकडून त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप खोटे असून आपण निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न होतो. मात्र, ‘माय लॉर्ड, मी एक नाही, तर 16 खून केले आहेत’, असा कबुली जबाब देताना तुम्ही आरोपीला ऐकलंय? अमेरिकेत (US) असा कबुली जबाब देणारी घटना घडलीय. यामुळे सुनावणी करणारे न्यायाधीशही अवाक झाल्याचं पाहायला मिळाले (US Man American says He Killed 16 People Not One during hearing in court).
या प्रकरणातील आरोपीवर अमेरिकेतील न्यूजर्सीत राहणाऱ्या एका 66 वर्षीय वयोवृद्धाच्या हत्येचा आरोप आहे. याशिवाय या आरोपीला त्याच्या पत्नीच्या आणि अन्य 3 लोकांच्या हत्येविषयी महत्त्वाची माहिती असल्याचाही दावा पोलिसांनी केला. 47 वर्षीय या आरोपीचं नाव सियान लेनन (Sean Lannon) असं आहे. आता मात्र आरोपी लेननने कोर्टात कबुली जबाब देताना फक्त पत्नीचाच नाही, तर न्यू मेक्सिकोतील 3 जणांसह आणखी 11 जणांचा म्हणजेच एकूण 16 जणांचा खून केल्याची कबुली दिलीय. असं असलं तरी या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबाची खातरजमा करण्यात आलेली नाही.
कुटुंबातील सदस्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर कबुली
वकील एलेक ग्यूटिरेज म्हणाले, “लेननने 16 लोकांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यातील 15 हत्या न्यू मेक्सिकोत आणि एक न्यूजर्सीत केलीय.’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लेनने आपल्या कुटुंबातील एका सदस्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर हा कबुली जबाब दिलाय (Sean Lannon Dabkowski). लेननला 10 मार्च रोजी अनेक राज्यांमध्ये शोधल्यानंतर अटक करण्यात आलीय. त्याने न्यूजर्सीतील पीडित मायकल डबकोवस्कीची गाडी चोरली होती. त्याच्यावर 66 वर्षीय मायकलच्या घरात जबरदस्ती घूसून त्याला जबर मारहाण केली. 5 मार्च रोजी ही गाडी न्यू मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या विमानतळावर सापडली. या गाडीत 4 मृतदेह होते.
मायकलच्या हत्येचं कारण काय?
लेननने 16 खून केल्याची कबुली दिली असली तरी अद्याप त्याच्याविरोधात आतापर्यंत केवळ न्यूजर्सीतील मायकल हत्येप्रकरणीच गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात न्यू मेक्सिकोमध्ये एकही गुन्हा दाखल नाही. लेननने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना हत्या करण्यामागचं कारणही सांगितलं. तो म्हणाला, “लहानपणी मायकलने माझं लैंगिक शोषण केलं होतं. मी त्या घटनेचे फोटो आणण्यासाठी त्याच्याकडे गेलो होतो (Sean Lannon Found). त्यावेळी आमचं भांडण झालं आणि मी त्याची हत्या केली.”
हेही वाचा :
पैशांच्या वादातून भंडाऱ्यात कंत्राटदाराची हत्या; मृतदेह कालव्यामध्ये फेकला
अहमदनगरचे प्रख्यात व्यापारी गौतम हिरण अपहरण-हत्या प्रकरण, पाच आरोपी जेरबंद
व्हिडीओ पाहा :
US Man American says He Killed 16 People Not One during hearing in court