Video: म्यानमार येथील भूंकपाने इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या…
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तेथील भयानक परिस्थितीचे व्हिडीओ व्हायलर होत आहेत. मोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

म्यानमार आणि थायलँड येथे 7.0 ते 7.7 मॅग्निट्यूड तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये हाहा:कार माजला आहे. अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून धाराशाही झाल्या आहेत. या भूंकापने दोन्ही देशात अफरातफरी माजली आहे. लोकांनी या भूकंपाची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बंदीस्त करीत सोशल मीडियावर अपलोड केली आहेत.
येथे पोस्ट पाहा –




म्यानमार येथे शुक्रवारी आलेल्या शक्तीशाली भूकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरह होत आहेत. या व्हिडीओतून तेथील भयानक परिस्थितीचा अंदाज आपल्यााला येऊ शकतो. कोसळणाऱ्या इमारतींनी धुळीचे लोट आकाशात उमटले आहेत. सर्वत्र किंचाळण्याचा आणि मदतीसाठी धावा करण्याचे आवाज येत आहेत. या भूकंपाची भयानक दृश्य पाहून अंगावर काटा येत आहे.
येथे पोस्ट पाहा –
थाईलैंड में 7.7 तीव्रता के भूकंप के दौरान गगनचुंबी इमारत ढहने का वीडियो – म्यांमार रहा भूकंप का केंद्र#Thailand | #earthquake | #Myanmar https://t.co/67zGbOfFNP pic.twitter.com/IZ2amMF93z
— RT Hindi (@RT_hindi_) March 28, 2025
प्रसिद्ध एव्हा ब्रिज देखील वाहून गेला
भूकंपाचे केंद्र म्यानमार येथील Sagaing शहरात असल्याचे म्हटले जात आहे. भूकंपाचे झटक्यांनी म्यानमाराच्या मांडलेय येथे इरावडी नदीवरील प्रसिद्ध एव्हा ब्रिज देखील वाहून गेला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी विभागाने दिलेल्या माहीतीनुसार भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल होती तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 7.0 इतकी होती. काही लोकांच्या मते हा भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता. देशातील अनेक भागातील दृश्य हादरविणारी आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ म्यानमार आणि थायलंड येथील आहेत. कोसळणाऱ्या इमारतींच्या दृश्यांनी या भूकंपाची तीव्रता लक्षात येते.
येथे पोस्ट पहा –
🚨 7.7 Magnitude Earthquake Hits Mandalay, Myanmar
Multiple buildings destroyed in devastating quake.#Myanmar #Earthquake #แผ่นดินไหว pic.twitter.com/fgQTBlUqjw
— Weather Monitor (@WeatherMonitors) March 28, 2025
अनेक लोक इमारतीत अडकले
‘द सन’ मधील वृत्तानुसार, बँकॉकमधील एका ३० मजली इमारतीत किमान ६७ लोक अडकल्याचे वृत्त आहे.असे म्हटले जाते की जेव्हा भूकंप झाला तेव्हा इमारतीत बांधकाम चालू होते. भूकंपाच्या केंद्रापासून ८०० मैल अंतरावर असलेल्या थायलंडच्या राजधानीत पहिल्या भूकंपाच्या झटक्यानंतर स्थानिक लोक प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्या इमारतींमधून रस्त्यावर धाव घेतली आहे. त्यांनी या इमारती कोसळतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.