Instagram block केलं म्हणून ढसाढसा रडली..! लोक म्हणाले, हिला देशापेक्षा अॅपची जास्त चिंता; Video viral
Influencer cries after instagram blocked : रशियामध्ये (Russia) इन्स्टाग्राम ब्लॉक करण्यात आले असून यामुळे रशियामधील इंटरनेट यूझर्स फोटो, व्हिडिओ शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम वापरू शकणार नाहीत. यात आता एका रशियन मुलीचा रडणारा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे.
Influencer cries after instagram blocked : रशियामध्ये (Russia) इन्स्टाग्राम ब्लॉक करण्यात आले असून यामुळे रशियामधील इंटरनेट यूझर्स फोटो, व्हिडिओ शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम वापरू शकणार नाहीत. या अॅपचा वापर आपल्या सैनिकांविरुद्ध हिंसाचार वाढवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. दरम्यान, एका रशियन मुलीचा रडणारा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये तिने इन्स्टाग्राम अॅपवर बंदी घातल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आणि म्हटले, की इन्स्टाग्राम तिचे ‘जीवन, आत्मा’ आहे. ट्विटरवर ‘नेक्स्टा’ने मुलीच्या रडण्याची क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ‘तुम्हाला वाटते का की इन्स्टाग्राम माझ्यासाठी फक्त कमाईचा स्त्रोत आहे? हे तर माझे संपूर्ण जीवन आहे, माझा आत्मा आहे. यासोबतच मी झोपते आणि उठते. गेली 5 वर्षे मी इन्स्टाग्राम वापरत आहे.
मृतांची नाही फोटोंचा चिंता
व्हिडिओमध्ये ही मुलगी रशियाने इन्स्टाग्रामवर घातलेल्या बंदीमुळे रडताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना नेक्स्टाने त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक रशियन ब्लॉगर रडत आहे. कारण तिच्या इन्स्टाग्रामने काम करणे बंद केले आहे. तिला तिच्या देशबांधवांसह हजारो मृत लोकांची अजिबात पर्वा नाही. तिची सर्वात मोठी चिंता, ही आहे की ती रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणाचे फोटो, व्हिडिओ आता पोस्ट करू शकणार नाही.
One of the #Russian bloggers cries that in two days her Instagram will stop working
She does not care at all about the thousands of dead people, including her compatriots. Obviously, her biggest worry right now is that she won’t be able to post pictures of food from restaurants. pic.twitter.com/LSdBiSlwHr
— NEXTA (@nexta_tv) March 11, 2022
सोशल मीडियावर करावा लागला टीकेचा सामना
जेव्हा इन्स्टाग्रामवर बंदी घातली गेली, तेव्हा मुलीने तिच्या फॉलोअर्सना सांगितले, की ती खूप दुःखी आहे. मात्र, सोशल मीडियावर तिला टीकेचा सामना करावा लागला. यूझर्सनी सांगितले, की तिला लोकांच्या जीवापेक्षा अॅपवर बंदी घातल्याची अधिक काळजी आहे. कमाईचे साधन गमावल्यावर काही लोकांनी तिच्या दु:खाचे समर्थनही केले आहे. विशेष म्हणजे रशियाने याआधीच येथे फेसबुकचा प्रवेश ब्लॉक केला आहे. याशिवाय ट्विटरवरही मर्यादित प्रवेश लागू करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम 14 मार्चपासून रशियामध्ये बंद आहे.