Video : गाड्यांच्या हालचालीत रस्त्याच्या मधोमध खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! थरकाप उडवणारी दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद

Russia Ukraine War attacked Video : रशियन सैन्य कीव शहरापासून 40 किमी. अंतरावर आहे. कीव शहरावर कुठल्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रशियन सैन्याचा 35 किमी. लांबीचा ताफा कीवच्या दिशेनं कूच करतो आहे.

Video : गाड्यांच्या हालचालीत रस्त्याच्या मधोमध खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! थरकाप उडवणारी दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद
खारकीव शहरावर मिसाईल हल्ल्यानं हाहाकारImage Credit source: Twitter Video Snap
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:47 PM

युक्रेनच्या कीव शहरासोबतच खारकीवला रशियन सैन्यानं (Russian Army) टार्गेट केलं आहे. हल्ल्याचे थरकाप उडवणारे नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच रस्त्याच्या मधोमध मिसाईनलं हल्ला करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Camera) कैद झाली आहे. मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. सकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्याची घटना अंगावर काटा आणणारी होती. या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय. काही गाड्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. युद्धामुळे फारशी वाहतूक नसली तर काही जण वाहनांमधून प्रवास करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. एका कार पुढे सरकत असतानाच अचानक रस्त्याच्या मधोमध मिसाईल (Missile attack) डागण्यात आलेल. यानंतर मोठा स्फोट झाला. आगीचा भडका उडालाय. या भीषण हल्ल्यात मोठी हानी झाली असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

मंगळवारी 8 वाजून 1 मिनिटांनी हा हल्ला करण्यात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. कीव शहरावर आधीच रशियानं हल्लाबोल केलाय. उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये लोकं दहशतीखाली वावरत आहे. अनेकजण बंकरमध्ये लपून आहेत. युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धाचे पडसाद गेले काही दिवसांपासून उमटत असताना मिसाईल हल्ल्याचे थरकाप उडवणारे व्हिडीओही समोर आले आहेत. रशियानं आता युक्रेनच्या नागरीवस्तीला निशाणा बनवलं आहे. या नागरी वस्तीत रशियानं मिसाईन हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

आजच्या आज भारतात परता!

कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्टही जारी करण्यात आला आहे. भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कीवमध्ये केव्हाही काही होऊ शकतं. त्यामुळे खबरदारी खातर अलर्ट जारी करत भारतीयांना कीव सोडण्याचं आवाहन करण्यात आलंय.

रशियन सैन्य कीव शहरापासून 40 किमी. अंतरावर आहे. कीव शहरावर कुठल्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रशियन सैन्याचा 35 किमी. लांबीचा ताफा कीवच्या दिशेनं कूच करतो आहे. रशियन सैन्याची कीवकडे वेगानं आगेकूच सुरु असून याबाबतचे फोटोही सॅटेलाईट फोटोही समोर आले होते. त्यामुळे आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.