Boris Johnson:असं काय झालंय इंग्लंडमध्ये की, मंत्री एका पाठोपाठ राजीनामे द्यायला लागलेत?

चार मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पद सोडण्याचा दबाव वाढू लागलेला आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्याविरोधातअविश्वास प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यात जॉन्सन विजयी झाले होते. त्यामुळे आता ते राजीनामा देणार का हा खरा प्रश्न आहे.

Boris Johnson:असं काय झालंय इंग्लंडमध्ये की, मंत्री एका पाठोपाठ राजीनामे द्यायला लागलेत?
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 7:19 PM

लंडन – इंग्लंडचे पंतप्रधान (Prime minister)बोरिस जॉन्सन (Boris Johnson)यांच्या कर्तृत्वावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोनाच्या काळात पार्टी करणारे जॉन्सन यांच्याविरोधातील आवाज वाढू लागला आहे. मंगळवारी रात्री इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक, आरोग्य सचिव साजिद जावादी यांनी राजीनामे (resignation) दिले आहेत. तर त्यानंतर बुधवारी बाल आणि कुटुंबकल्याण मंत्री वील क्विंस आणि संसदेतील खासगी सचिन लॉरा यांनीही राजीनामा दिला आहे. चार मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पद सोडण्याचा दबाव वाढू लागलेला आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्याविरोधातअविश्वास प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यात जॉन्सन विजयी झाले होते. त्यामुळे आता ते राजीनामा देणार का हा खरा प्रश्न आहे.

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या टार्गेटवर पंतप्रधान

राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्यायच उरलेला नव्हता, असे वील क्विन्स यांनी सांगितले आहे. तर लॉरा टॉट यांनी सांगितले आहे की, सरकारवरील त्यांचा विश्वास उडाला असल्याने, त्यांनी राजीनामा दिला आहे. आरोग्य आणि अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता जॉन्सन यांच्यावर दबाव वाढताना दिसतो आहे. आरोग्य सचिवांनी राजीनामा देताना केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांवरील विश्वास उडाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका भ्रष्ट सदस्याला दिलेले मंत्रिपद, युक्रेन जनतेला युद्धात दिलेला पाठिंबा अशीही इतर कारणे यामागे आहेत.

इंग्लंडमधील नागरिकांना सरकारकडून प्रामाणिकतेची अपेक्षा

या सगळ्या मंत्र्यांच्या निशाण्यावर बोरिस जॉन्सन आणि त्यांची कार्यपद्धती आहे. कोरोना काळात जून २०२०मध्ये नियमांचे उल्लंघन करत डाऊनिंग स्ट्रीट येथे पार्टी केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. पक्षाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यांना पदावरुन हटवण्यासाठी १८० मतांची गरज होती. त्यात बोरिस यांच्या समर्थनार्थ २११ तर त्यांच्याविरोधात १४८ मते पडली होती.बोरिस यांनी ६३ मतांनी हा ठराव जिंकला असला तरी त्यांच्याविरोधात वातावरण तयार झाल्याचे समोर आले होते.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबरपर्यंत पदावरच राहण्यासाठी जॉन्सन आग्रही

जॉन्सन यांच्याविरोधातील विश्वासदर्शक ठराव त्यांनी जिंकल्यानंतर ते सप्टेंबरपर्यंत पदावर राहू शकतात. एकदा हा प्रस्ताव जिंकल्याने त्यांच्याविरोधात पुढील वर्षभर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. त्यामुळे आता जरी मंत्र्यांचे राजीनामे पडत असले तरी जॉन्सन यांनी पदावरुन हटण्यास तूर्तास तरी नकार दर्शवला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.