Norovirus : नोरोव्हायरसने महासत्तेला धोका, काय आहेत लक्षणे आणि बचाव ?

नोरोव्हायरस हा एक साथीचा आजार आहे. अमेरिकेत हा आजार झालेल्यांची संख्या वाढत आहे. डिसेंबर पासून या नोरोव्हायरसची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. हा व्हायरस नेमका काय आहे ? त्याची लक्षणे काय आणि उपाय काय ? पाहूयात...

Norovirus : नोरोव्हायरसने महासत्तेला धोका, काय आहेत लक्षणे आणि बचाव ?
Norovirus Outbreak in usa
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:56 PM

Norovirus : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत एका नव्या नोरोव्हायरसच्या केसेस वाढत आहेत. डिसेंबरपासून या व्हायरसचे ९० हून अधिक केसेस आढळले आहेत. नोरोव्हायरल हा वेगाने पसरणारा आजार आहे.काही प्रकरणात हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला देखील होतो. ‘सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेन्शन’ ( सीडीसी ) च्या मते अमेरिकेत अनेक विभागात नोरोव्हायरसच्या केसेस वाढतच आहेत. नोरोव्हायरसची लक्षणे काय ? आणि बचावाचे काय उपाय हे पाहूयात…

नोरोव्हायरस पोट आणि आतड्यांवर हल्ला करतो. यामुळे या व्हायरसने झालेल्या गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार देखील म्हटले जाते. या व्हायरसने संक्रमण झाल्यानंतर रुग्णाला उलट्या, जुलाब आणि पोटदुखी सारख्या तक्रारी सुरु होतात. काही प्रकरणात डोकेदुखी आणि कायमस्वरुपी अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.  हा आजार दूषित अन्न आणि पाणी किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. सर्वसाधारणपणे जास्त केसेस या संक्रमित अन्नातून होत असतात. नोरोव्हायरसचा कोणताही खात्रीलायक उपचार नाही. लक्षणे पाहूनच या आजारावर उपचार केले जातात.

अमेरिकेत का पसरतोय नोरोव्हायरस

नोरोव्हायरस कोणताही नवीन आजार नसून अनेक दशकांपूर्वीचा आजार आहे. या व्हायरसचे पहिले प्रकरण १९६८ मध्ये ओहियो येथील नॉरवॉकमधील एका शाळेत उघड झाले आहे. त्यावेळी जो स्ट्रेन मिळाला होता,त्याला नॉरवॉक व्हायरसच्या रुपात ओळखले जायचे. त्यानंतर याचे नाव नोरोव्हायरस असे म्हटले जाते असे साथरोगाचे तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

वेळीच लक्षणे ओळखली तर..बचाव

नोरोव्हायरस अमेरिकेत एक सामान्य आजार आहे. तेथे अशी प्रकरणे येत जात असतात. हा व्हायरस पोट आणि आतड्यांना प्रभावित करतो. याची लक्षणे सर्वसामान्यपणे एक ते दोन दिवसात दिसतात आणि आठवडाभरापर्यंत दिसतात. नोरोव्हायरस घातक नसून वेळीच लक्षणे ओळखली तर त्यापासून सहज बचाव होतो. परंतू ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी यापासून सावध राहीले पाहीजे. सध्या अमेरिकेत या व्हायरसच्या केसेस जास्त वाढल्या आहेत. भारताला यापासून कोणताही धोका नसल्याचे डॉ. जुगल किशोर यांनी म्हटले आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.