132 प्रवांशाचा मृत्यू घेणाऱ्या चिनी विमान अपघाताचे काय आहे रहस्य, चीनने जाणूनबुजून विमान पाडल्याचा अमेरिकेचा दावा
या विमानांच्या अवशेषात शोधण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्सचा तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉकपिटमध्ये घुसून कुठल्यातरी व्यक्तीने जाणीवपूर्वक जेट दुर्घटना घडवून आणली, असा निष्कर्ष या तपासात काढण्यात आला आहे.
वॉशिंग्टन – चीनच्या गुआंश्मीत यावर्षी मार्चमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेबाबत (Chinese plane crash)धक्का देणारी माहिती समोर आली आहे. या चायना इस्टर्न जेटला चीनमध्ये जाणूनबुजून पाडण्यात आले, (deliberately shot down)असा दावा अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या विमान दुर्घटनेत १२३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर असा १३२ जणांचा (132 deaths)बळी गेला होता. दुर्घटनेनंतर घटनास्थळी सापडलेला फ्लाईट डेटा रेकॉर्डर तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात आला होता. या विमानांच्या अवशेषात शोधण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्सचा तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉकपिटमध्ये घुसून कुठल्यातरी व्यक्तीने जाणीवपूर्वक जेट दुर्घटना घडवून आणली, असा निष्कर्ष या तपासात काढण्यात आला आहे. दुसरीकडे रॉयटर्स या वृत्तसंस्थेला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले नव्हते. त्यानंतर पायल्टसच्या कार्याची चौकशी करण्यात आली आहे.
Chinese plane crash that killed 132 people ‘was caused intentionally by someone in the cockpit’ https://t.co/UpY1sVMM7b
हे सुद्धा वाचा— Daily Mail Online (@MailOnline) May 18, 2022
यावर्षी २१ मार्चला झाली होती दुर्घटना
फ्लाईल एमयू ५७३५ ने २१ मार्च रोजी, दुपारी एकच्या सुमारास कुनमिंग चांगशुई विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान ३ वाजता गुआंगझोऊ इथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र हे विमान दोन मिनिटांहून कमी वेळात ३० हजार फूट खाली पडले. ५६३ किमी प्रतितासाच्या वेगाने हे विमान डोंगरांना जाऊन आदळले आणि हा अपघात घडला. उड्डाण केल्यानंतर ७१ व्या मिनिटांनंतर विमान दपर्घटना घडली. लँड करण्यापूर्वी ४३ मिनिटे आधी या विमानाचा संपर्क तुटला होता.
काय असते ब्लॅक बॉक्सचे महत्त्व
ब्लॅक बॉक्समधून सुरुवातीला काही माहिती मिळाली नव्हती . सुरुवातीला जेव्हा विमान दुर्घटनेच्या स्थानावरुन ब्लॅक बॉक्स ताब्यात घएतला होता, तेव्हा तो इतक्या खराब अवस्थेत होता की, त्यातून काहीही माहिती मिळणे शक्य नव्हते. विमानात दोन ब्लॅक बॉक्स असतात. त्यातील एक ब्लॅक बॉक्स कॉकपिटमधील चर्चा आणि इतर आवाज रेकॉर्ड करीत असतो. दुसरा बॉक्स हा गती, दिशा, उंची आणि पायलट देत असलेल्या निर्देशांची साठवणूक करीत असतो.
ध्वनीच्या वेगाने उडत होते विमान
दुर्घटनेपूर्वी हे विमान अत्यंत वेगाने प्रवास करीत होते. अपघआतापूर्वी या विमानाचा वेग ६४० मील म्हणजेच ९६६ किलोमीटर–प्रतितास इतका होता. त्यानंतर विमान गतीने खाली आले आणि डोंगरांना जाऊन धडकले होते. विमानाची गती जास्त असल्यानेही यातील अनेक बाबी समोर येत नव्हत्या. विमानातील व्हॉईस रेकॉर्डरही फारसे रेकॉर्ड करु शकला नव्हता. समु्दपातळीवर विचार केल्यास ध्वनीची गती ही ७६१ मील प्रतिसात असतो. जास्त उंचीवर ही गती कमी होते. ३५ हजार फूट उंचीवर ध्वनीची गती ही ६३३ मील प्रतिसात इतकी असते.