AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे आहे किर्गिस्तान हा देश, जगात का आलाय अचानक चर्चेत?

जगात सध्या किर्गिस्तान हा देश अचानक चर्चेत आला आहे. या देशाचा एक वेगळा इतिहास आहे. १९९१ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यानंतर आता इतक्या वर्षानंतर देखील तो आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण अचानक हा देश चर्चेत येण्यामागचं कारण आहे.

कुठे आहे किर्गिस्तान हा देश, जगात का आलाय अचानक चर्चेत?
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 9:31 PM

किर्गिस्तान सध्या एका घटनेमुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी विद्यार्थ्यांसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे हा चर्चेत आला आहे. राजधानी बिश्केकमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानचे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गिस्तानला जातात. किर्गिस्तानमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे चार विद्यार्थी ठार झाले आहेत.पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनमध्ये प्रकाशित जानेवारी 2024 च्या अहवालानुसार, सुमारे 12 हजार पाकिस्तानी विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये शिकत आहेत. वैद्यकीय आणि फार्मा अभ्यासक्रमासाठी हे विद्यार्थी या ठिकाणी जात असतात.

पाकिस्तानने 10 मे 1992 रोजी औपचारिकपणे किर्गिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले होते किर्गिस्तानला 20 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच दोन्ही देशांमधील संबंध सुरू झाले. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध संपुष्टात आले असले, तरीही मोठ्या संख्येने पाकिस्तानी विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात.

किर्गिस्तान हा केवळ इस्लामिकच नाही तर बहु-जातीय आणि बहु-धार्मिक देश आहे. येथे विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. पण मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिया, सुन्नी आणि अहमदिया लोकांची संख्या येथे जास्त आहे. तसेच ख्रिश्चन, बौद्ध आणि ज्यू लोकं ही मोठ्या संख्येने राहतात. येथे इस्लाम हा मुख्य धर्म मानला जातो.

किर्गिस्तान सुन्नी आहे की शिया?

किर्गिस्तानमध्ये मुस्लीम समाजाचे लोक अधिक आहेत. पण मुस्लिमांमध्येही या देशात सुन्नी लोकसंख्या खूप जास्त आहे. किर्गिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे ९० टक्के आहे. तर ख्रिश्चनांची संख्या १५ टक्के आहे. सुन्नी लोकसंख्या बहुतेक हनफी पंथाची आहे. आठव्या शतकात हे लोक या भागात आले. किर्गिझ मुस्लीम हे त्यांचा धर्म विशिष्ट पद्धतीने पाळतात. किर्गिझस्तानमध्ये स्वातंत्र्यानंतर इस्लामिक प्रथा वाढल्या.

पाकिस्तानमध्ये ही बहुतेक किर्गिझ लोकं राहतात. हे मूळ स्थलांतरित तुर्क आहेत. पाकिस्तानातील किर्गिझ लोक तुर्किक भाषा बोलतात. किर्गिझ लोकं हे मध्य आशियाई जमातींचे वंशज होते. हे लोक पश्चिम मंगोलियामध्ये सुमारे 201 ईसापूर्व उदयास आले. परंतु आधुनिक किर्गिझ हे अंशतः येनिसेई किरगिझचे वंशज आहेत, जे सायबेरियातील येनिसेई नदीच्या खोऱ्यात राहत होते.

किर्गिस्तान कुठे आहे?

किर्गिस्तान हा मध्य आशियातील एक देश आहे. याच्या चारही बाजूंनी डोंगर आणि जमिनीने वेढलेले आहे. किर्गिझस्तानच्या उत्तरेला कझाकिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान, दक्षिण-पश्चिमेला ताजिकिस्तान आणि पूर्वेला चीन आहे. किर्गिझ प्रजासत्ताक 198500 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. 65 टक्के डोंगराळ भाग आहे. येथे अस्मायक कौलचे क्षारयुक्त सरोवर आहे जे १६०६ मीटरच्या उंचीवर आहे, जे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर मानले जाते. विशेष म्हणजे बर्फाच्छादित भागात असूनही हा तलाव वर्षभर गोठत नाही.

किर्गिस्तानचे जुने नाव काय आहे?

सध्या चर्चेत असलेले किर्गिस्तानचे जुने नाव किरगिझिया आहे. पण आता त्याला किर्गिस्तान म्हणतात. या देशाचे अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक आहे. हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाते.

रशियन साम्राज्य आणि सोव्हिएत युनियन

१९ व्या शतकाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा विस्तार मध्य आशियामध्ये झाला. यानंतर, किर्गिस्तानचा पूर्व भाग 1924 मध्ये सोव्हिएत युनियनच्या स्थापनेनंतर स्वायत्त प्रजासत्ताक म्हणून समाविष्ट करण्यात आला. 1936 मध्ये त्याला “किर्गिझ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक” चा दर्जा देण्यात आला.

किर्गिस्तान कधी स्वतंत्र झाला?

1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर किर्गिझस्तान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, किर्गिस्तानचा विकास संसदीय प्रजासत्ताक म्हणून झाला आहे. हा देश आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.