AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hamas : इस्रायलने ज्याच्या गावावर बुलडोझर चालवलं, तोच इस्रायला संपवायला निघालाय; कोण आहे हमासचा नेता?

पॅलेस्टाईनच्या हमासने काल इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. हमासने इस्रायलवर एकाचवेळी 5 हजार रॉकेटचा हल्ला केला. त्यामुळे इस्रायलमध्ये हाहा:कार उडाला आहे. इस्रायलमध्ये मृत्यूचं तांडव निर्माण झालं आहे.

Hamas : इस्रायलने ज्याच्या गावावर बुलडोझर चालवलं, तोच इस्रायला संपवायला निघालाय; कोण आहे हमासचा नेता?
Sheikh Ahmed Ismail Hassan YassinImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 3:21 PM

तेल अवीव | 8 ऑक्टोबर 2023 : बलाढ्य इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमास पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रायलवर वारंवार हल्ला करणाऱ्या हमासने काल इस्रायलवर पाच हजार रॉकेटचा मारा केला. त्यामुळे इस्रायलच्या गल्लोगल्लीत अग्नितांडव निर्माण झालं आहे. 300 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. शेकडो लोक जखमी झाले आहेत. असंख्य घरं, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. हमासने हे सर्व केलं ते केवळ सूड भावनेतून. बदला घेण्यासाठी आणि आपल्या संस्थापक नेत्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. शेख अहमद यासीन याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कोण आहे हा यासीन? काय झालं त्याच्या आयुष्यात ज्यामुळे तो सुडाने पेटला…

इस्रायलने 1948मध्ये पॅलेस्टाईनवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनवर ताबा मिळवला. त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनमधील 500 हून अधिक गावांवर बुलडोझर चालवला. त्यात शेख अहमद यासीनच्याही गावाचा समावेश होता. आपल्या जन्म गावाला आपल्या डोळ्यासमोरच ढासळताना पाहून यासीनला प्रचंड वेदना झाल्या. 1936मध्ये तो पॅलेस्टाईनच्या याच अल-जुरा गावात जन्मला होता. तो अवघ्या 12 वर्षाचा असताना त्याचं गाव जमीनदोस्त करण्यात आलं. त्यानंतर त्याचं कुटुंब गाजा पट्टीत शिफ्ट झालं. इस्रायलच्या हल्ल्यात त्यालाही मार लागला. त्याला अपंगत्व आलं. वयाच्या 12 व्या वर्षापासून तो व्हिलचेअरवरच असायचा.

इजिप्तमध्ये शिक्षण, धार्मिक नेता

अपंगत्वावर मात करून यासीनने शिक्षण घेतलं. 1959मध्ये त्याने इजिप्तच्या शम्स विद्यापीठातून शिक्षण घेतलं. मात्र, पुढे आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडावं लागलं. याच काळात तो मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेच्या संपर्कात आला. या संघटनेचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे तो गाजा येथे परत आला. त्यानंतर त्याने अरबी शिकवण्यास सुरूवात केली. हळूहळू धार्मिक नेता म्हणून त्याने त्याची ओळख तयार केली.

हमासची स्थापना

1983मध्ये गाजामध्ये इस्रायलच्या सैन्याने यासीनला पकडलं होतं. भूमिगत संघटना स्थापन करणे, शस्त्र ठेवण्याच्या आरोपावरून त्याला 13 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन वर्षानंतर कैद्यांच्या अदलाबदलीच्या नियमानुसार त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर 1987मध्ये त्याने हमासची स्थापना केली. त्यावेळी तो गाजातील मुस्लिम ब्रदरहूडचा नेता होता.

डोळा गेला, ऐकायला येत नव्हतं

हमासही पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना आहे. इस्रायलला नेस्तनाबूत करणे हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. हमास आणि पॅलेस्टाईन हे इस्रायला आक्रमक मानतात. त्यामुळेच हमासकडून इस्रायलवर वारंवार हल्ले केले जातात. 1989मध्ये यासीनला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्याला 40 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. त्याच्यावर हिंसा भडकावण्याचा आणि इस्रायली सैनिकांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

11 मुलांचा बाप असलेल्या यासीनने तुरुंगात आठ वर्ष काढले. 1997मध्ये इस्रायल आणि जॉर्डनचा राजा हुसैन यांच्या दरम्यान एक करार झाला. त्यानंतर यासीनची सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर तो आजारीच असायचा. तुरुंगात त्याचा एक डोळा निकामी झाला होता. त्याला श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. त्याला नीट्सं ऐकायलाही येत नव्हतं.

अशी झाली अखेर

सप्टेंबर 2000मध्ये इस्रायलविरोधात बंड सुरू झालं. इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे यासीनने इस्रायलसमोर युद्धविरामचा प्रस्ताव ठेवला होता. वेस्ट बँक, गाजा आणि पूर्व येरुशलममधून इस्रायलने निघून जावं अशी मागणी त्याने केली होती. पॅलेस्टाईनच्या कार्यकर्त्यांची हत्या थांबवण्याची मागणीही त्याने केली होती. हा प्रस्ताव आल्यानंतरही इस्रायलने त्याच्या हत्येचा प्रयत्न केला.

सप्टेंबर 2003 मध्ये इस्रायलने एफ-16 फायटर जेटद्वारे गाजा शहरात बॉम्ब वर्षाव केला होता. या हल्ल्यातून यासीन थोडक्यात बचावला. पण त्यानंतर 22 मार्च 2004मध्ये इस्रायलने केलेल्या हेलिकॉप्टर स्ट्राईकमध्ये तो मारला गेला. सकाळी नमाज पढण्यासाठी जात असताना तो मारला गेला. त्याच्यासोबत इतर 9 जणांचाही मृत्यू झाला होता.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.