Hamas Leader : खालिश मशाल, अल-हय्या, मूसा…हानिया आणि सिनवार हे ठार झाल्यानंतर आता हमासचा लीडर कोण? कोण चालवतंय संघटना

Hamas New Leader : Israel लष्कराने गाजा पट्टीत हमासचा मुख्य नेता याह्या सिनवार याचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी इस्त्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता. दाव्यानुसार, सिनवार यानेच या हल्ल्याची योजना आखली होती. त्याच्या खात्म्यानंतर हमास कुणाच्या नेतृत्वात पुढे जाणार या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

Hamas Leader : खालिश मशाल, अल-हय्या, मूसा...हानिया आणि सिनवार हे ठार झाल्यानंतर आता हमासचा लीडर कोण? कोण चालवतंय संघटना
हमासचे नवीन नेता कोण?
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:20 AM

इस्त्रायलच्या सैन्याने गाजाचा लादेन अशी ओळख असलेल्या हमासचा नेता याह्या सिनवार याचा खात्मा करण्याचा दावा केला आहे. याह्या सिनवार यानेच 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्रायलवर हल्ल्याची योजना आखली होती. या हल्ल्यात इस्त्रायलमधील 1200 हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाला होता. सिनवार ठार झाल्याने हमासला मोठा झटका बसला आहे. इस्माईल हानिया मारल्याने गेल्यानंतर याह्याने हमासचे नेतृत्व केले होते. या हल्ल्यानंतर गाजा पट्ट्यातून हमास पूर्णपणे संपवून टाकणे हेच इस्त्रायलचे लक्ष्य आहे. परराष्ट्र मंत्री इसरायल काट्ज यांनी याह्या याला IDF ने ठार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता हमासचे नेतृत्व कोण करणार याचे उत्तर समोर आले आहे.

हमासचा नवीन लीडर कोण?

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांनी 7 ऑक्टोबरचा बदला घेतल्याचे सांगितले. पण हमास विरोधातील युद्ध थांबणार नसल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून याह्या सिनवार सुरक्षित स्थळी लपला होता. पण त्याचा खात्मा झाला. सध्या हमासचे नेतृत्व कोण करणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही हमासचे काही प्रमुख नेते अजूनही सुरक्षित ठिकाणी आहेत. त्यांच्या नावाची आता चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

खालिद मशाल – खालिद मशाल याचा जन्म 28 मे 1956 रोजी वेस्ट बँकच्या रामल्ला जवळ झालेला आहे. 15 वर्षांच्या वयात त्याने इजिप्त येथील सुन्नी इस्लामिक संस्था मुस्लिम ब्रदरहुड संघटनेत प्रवेश केला. या संघटनेच्या मदतीने त्याने 1987 मध्ये हमासची स्थापना केली. टाईम मॅगझिनने त्याला इस्त्रायलला सर्वाधिक त्रास देणारा हमास नेता असे म्हटले आहे. इस्त्रायल एजंटने त्याला विष पाजले होते. त्यानंतर तो कोमात गेला होता. पण तो वाचला. त्याने हमासच्या राजकीय विंगचा राजीनामा दिला असला तरी तो अजून ही या संघटनेचा सर्वोच्च नेता आहे.

खलील अल हय्या – खलील अल हय्या हा सध्या कतारमध्ये राजकीय विजनवासात आहे. तो गेल्या काही दशकांपासून या संघटनेचा प्रमुख आहे. सध्या मारल्या गेलेल्या अनेक नेत्यांचा तो प्रमुख आहे. त्याने पॅलेस्टाईन ब्रटरहूड संघटना स्थापन केली होती.

मोहम्मद डेफ – हा इस्त्रायलचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी आहे. याह्या सोबत मिळून त्याने 7 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर हल्ल्याची योजना आखली होती. यापूर्वी पण त्याने इस्त्रायलवर अनेक वेळा घातक हल्ले केले आहे. 1996 मध्ये या देशात झालेल्या सलग आत्मघातकी हल्ल्यामागे याचाच हात असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद डेफ याचा खात्मा केल्याचा दावा इस्त्रायली लष्काराने केला होता. हमासने हा दावा फेटाळून लावलेला आहे.

मुसा – मुसा अबू मरजौक हा हमासच्या राजकीय विंगचा एक प्रमुख नेता आहे. हमासच्या स्थापनेत त्याने हिरारीने सहभाग घेतला. त्याच्या राजकीय जीवनाची सुरूवात संयुक्त अरब अमिरातपासून झाली. त्याने अमेरिकेत गेल्यावर तिथून हमाससाठी निधी जमावला. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाल्याने अमेरिकन सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली. त्याला 22 महिने तुरुंगात काढावी लागली. अमेरिकेचे नागरिकत्व सोडावे लागले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.