Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?

अमेरिकेसह जगभरात अनेकांनी जगातिक साथीरोग ठरलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग चीनमधील लॅबमधून झाल्याचा आरोप सातत्याने केला.

चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:41 PM

बीजिंग : अमेरिकेसह जगभरात अनेकांनी जगातिक साथीरोग ठरलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग चीनमधील लॅबमधून झाल्याचा आरोप सातत्याने केला. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेल्या अहवालात कोरोना संसर्ग कसा झाला यावर मोठा खुलासा केलाय. या अहवालानुसार कोरोना विषाणू आधी प्राण्यांमध्ये आला आणि मग त्याचा माणसांना संसर्ग झालाय (WHO report on how Corona virus infection spread over the world).

कोविड-19 च्या उगमाचा (Covid-19 Origin) शोध घेण्यासाठी WHO च्या संशोधकांच्या टीमने चीनचा (China) दौराही केला. यानंतरच्या अभ्यासानुसार कोरोनाचा विषाणू आधी वटवाघळातून इतर प्राण्यांमध्ये केला आणि नंतर माणसात संसर्ग झाला. प्राण्यांपासून संसर्गाचीच शक्यता सर्वाधिक आहे, वुहानच्या प्रयोगशाळेतून (Laboratory) असा विषाणू पसरण्याची शक्यता खूप कमी आहे, असंही मत त्यांनी नोंदवलंय.

सर्वात आधी वुहानमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याचा युक्तीवाद

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून यासाठी चीनला जबाबदार धरण्यात आलं. चीनमधील वुहान लॅबमधून कोरोना विषाणू जगात पसरल्याचा दावाही करण्यात आला. यासाठी सर्वात आधी वुहानमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याचा युक्तीवाद करण्यात आला. डिसेंबर 2019 मध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाने जगभरात हातपाय पसरले.

WHO पथकाकडून चीनमध्ये जाऊन तपास

दुसरीकडे चीनने जगाला कोरोनाबाबत माहिती देण्यात उशीर केल्याचाही आरोप झाला. चीनने मात्र हे आरोप फेटाळले होते. तसेच हा विषाणू समुद्री अन्नातून चीनमध्ये आल्याचं सांगितलं. यानंतर WHO चं पथकाने चीनच्या या दाव्याची तपासणी करण्यासाठी चीनमध्ये जाऊन पाहणी केली.

WHO चा अहवाल उशीराने प्रकाशित झाल्यानेही चीनवर संशय

एपी या वृत्तसंस्थेला मिळालेल्या WHO च्या अहवालात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्याचंही नमूद करण्यात आलंय. म्हणूनच त्याचा तपास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. या पथकाने प्रयोगशाळेतून विषाणू संसर्ग लीक झाल्याचा मुद्दा सोडून इतर अनेक मुद्द्यांवर सखोल तपासाची शिफारस केली आहे. हा अहवाल उशिराने प्रकाशित झाल्याने चीनने अहवाल प्रभावित करण्यासाठी उशीर केल्याचा आरोपही झाला.

कोरोना विषाणू पसरण्याबाबत अहवालात काय?

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढलाय, “कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघळातून अन्य एका प्राण्यात आणि तेथून माणसात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या संशोधनात वटवाघळातून माणसात संसर्ग होण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात आला. यात कोल्ड चेन फूड प्रोडक्ट्सच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र, तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. हा विषाणू पसरण्यास कारण ठरणारे घटक वटवाघळात आहेत. मात्र, वटवाघळातील हे घटक आणि कोरोना विषाणूत सापडलेले घटक यात अनेक दशकांचा फरक आहे. त्यामुळे या दोघांमध्ये आणखी एक कडी असल्याचा अंदाज आहे.”

हेही वाचा :

World News Bulletin: इंडोनेशियात चर्चबाहेर आत्मघातक हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या

China Virus Passport : कोरोनाला थोपवण्यासाठी चीनमध्ये ‘व्हायरस पासपोर्ट’चं लाँचिंग, जाणून घ्या नेमकी भागनड काय?

ऊर्जामंत्र्याचे अपयश झाकण्यासाठी चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

व्हिडीओ पाहा :

WHO report on how Corona virus infection spread over the world

धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.