कोरोना ऑस्ट्रेलियन बीफमधून प्रसारित जागतिक आरोग्य संघटनेच्या चीनमध्ये गेलेल्या टीमचं मत, अमेरिकेचा नेता म्हणतो…..

WHO च्या टीमनं केलेल्या अभ्यासात कोरोना विषाणू पसरण्यासाठी ऑस्ट्रेलियन बीफ कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. WHO supports corona virus spread

कोरोना ऑस्ट्रेलियन बीफमधून प्रसारित जागतिक आरोग्य संघटनेच्या चीनमध्ये गेलेल्या टीमचं मत, अमेरिकेचा नेता म्हणतो.....
जागतिक आरोग्य संघटना
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 12:22 PM

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाला का? याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) टीम जवळपास एख महिनाभर चीनमध्ये (China) होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमनं केलेल्या अभ्यासात कोरोना विषाणू पसरण्यासाठी ऑस्ट्रेलियन बीफ कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. (WHO supports China and said corona virus spread from Australian beef)

जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे पीटर बेन एम्बारेक यांनी कोरोनाचा प्रसार कशामुळं झाला यावर अजून संशोधनाची गरज अशल्याचं म्हटलं. डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचं पहिलं प्रकरण चीनच्या वुहानमध्ये समोर आलं होते. त्यानंतर वुहान इनस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी या संस्थेने मोठ्या स्तरावर नमुने एकत्र केले होते. त्यानंतर कोरोना विषाणू चीनमध्ये पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, चीननं ते आरोप फेटाळले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या टीम मध्ये 10 देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

माईक पोम्पिओंचा जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू ऑस्ट्रेलियन बीफमध्ये प्रसारित झाल्याचं म्हटल्यानंतर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओंनी टीका केलीय. पोम्पिओंनी जागतिक आरोग्य संघटनेचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये राजकारण सुरु झाल्याचा आरोप केला. यामुळेच अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलो, असं माईक पोम्पिओ म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव चीनच्या राष्ट्रपतीसमोर नतमस्तक झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.

WHO ची 10 सदस्यीय टीम

जागतिक आरोग्य संघटनेची 10 सदस्यांची टीम चीनला गेली होती. यामध्ये 10 देशांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी चीनमधील रुग्णालयं, संशोधन संस्था, मासळी बाजार आणि अन्य ठिकाणांचा दौरा केला. चीनच्या वतीनं लियांग वेनीयन यांनी कोरोना विषाणू वुहानमधील बाजारात समोर आला नसून शहरातील दुसऱ्या भागात समोर आला, असावा असा दावा केला.

संबंधित बातम्या

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?

चीनला धोबीपछाड कसा द्यायचा? वाचा गडकरी फॉर्म्युला

(WHO supports China and said corona virus spread from Australian beef)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.