ज्याला पती मानलं तो तर भाऊच निघाला, लग्नाच्या १० वर्षांनतर झाला धक्कादायक खुलासा
सोशल मीडियावर या महिलेने केलेल्या खुलाशामुळे बराच हंगामा झाला. पती हा तिचा चुलत भाऊच असल्याचे त्या महिलेने नमूद करताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केले.
Woman Marries Her Cousin Brother : एका महिलेच्या लग्नाला जवळपास 17 वर्ष झाल्यानंतर तिने केलेल्या खुलाशामुळे सर्वजण अवाक् झाले आहेत. या महिलेने सोशल मीडियावर (social media) खुलासा केला आहे की तिचा हा पती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाऊच आहे. तिच्या या स्टेटमेंटमुळे सर्वजण विचारात पडले. मात्र आपलं लग्न (woman married cousin by mistake) चुकून झाल्याचे त्या महिलेने नमूद केले. आता काही झालं तरी मी माझ्या पतीपासून आणि मुलांपासून वेगळी राहू शकत नाही, जग काहीह म्हणो, मला काहीच फरक पडत नाही असंही तिने स्पष्ट केलं.
अमेरिकेतील कोलोरॅडे येथे राहणारी 37 वर्षीय सेलिना क्विनोस ही तिचा पती जोसेफ (वय 44) याच्यासोबत सुखाने संसार करत होती. मात्र लग्नाच्या दहा वर्षानंतर एका सत्यामुळे त्या दोघांनाही मोठा धक्काच बसला. ते दोघेही एकमेकांची चुलत भावंडं आहेत हे समजल्यावर ते अवाक् झाले.
सेलिना व जोसफेला तीन मुलं आहेत. आपल्यामध्ये असं काही नातं आहे, याची आम्हाला दोघांनाही काहीच कल्पना नव्हती असे सेलिनाने नमूद केलं. सेलिना काहीच कारण नसताना, असंच तिची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर हा मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला. ज्याच्याशी लग्न केलं, पती मानलं तो आपला चुलत भाऊ आहे हे समजल्यावर ती अवाक् झाली. हे कळल्यानंतर मी हलले होते. आम्ही दोघांनी वेगळं व्हायला हवं असे विचारही माझ्या मनात येऊ लागले होते, असं सेलिनाने नमूद केलं.
अशी झाली होती भेट
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, सेलिना आणि जोसेफ यांची भेट एका हॅलोवीन पार्टीत झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरू केले. काही काळानंतर त्यांनी लग्नही केले. काही महिन्यांतच त्यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण होतील. मात्र लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्यावरच त्यांना त्यांच्यामधील नात्याबद्दल कळलं पण तरीही एकमेकांवरील प्रेमाखातर आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी एकत्रच राहण्याचा निर्णय घेतला.
त्या दोघांनीही सोशल मीडियावर ही गोष्ट जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. तुम्ही दोघं बरेचसे सारखे दिसता, तरी तुम्हाला कधीच संशय कसा आला नाही, असा सवाल एका युजरने केला. तर काहींनी या नात्यावरच कडाडून टीका केली आहे.
मात्र सेलिना आणि तिचा पती या दोघांनीही एकत्र राहण्याचाच निर्णय घेतला असून लोकं काय म्हणतील याने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचे जोसेफने सांगितलं. मी कधीच सेलिनाची साथ सोडणार नाही असंही जोसेफने स्पष्ट केलं आहे.