World Braille Day | अपघाताने अंध झालेल्या व्यक्तीने लावला ‘ब्रेल’ लिपीचा शोध, वाचा लुईस ब्रेल यांच्याविषयी…
लुईस ब्रेल जन्मापासूनच अंध नव्हते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्याबरोबर एक घटना घडली, ज्याने आयुष्यभर त्यांची दृष्टी हिरावून घेतली.
मुंबई : आजच्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी, 1809 रोजी महान फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ लुईस ब्रेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी एक विशिष्ट लिपी शोधली, जी पुढे अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचा स्रोत बनली. त्यांच्या नावावर हे या लिपीला ‘ब्रेल लिपी’ असे नाव देण्यात आले. त्यांच्या स्मृतींन उजाळा देण्यासाठी 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून साजरा केला जातो (World Braille Day special story on Louis braille).
अपघाताने गमावली दृष्टी!
लुईस ब्रेल जन्मापासूनच अंध नव्हते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्याबरोबर एक घटना घडली, ज्याने आयुष्यभर त्यांची दृष्टी हिरावून घेतली. या अपघातावेळी लुईस ब्रेल केवळ 3 वर्षांचे होते. ते वडिलांच्या दुकानात खेळत होते. त्याच्या वडिलांच्या दुकानात घोडेस्वारीशी संबंधित वस्तू बनवल्या जात होत्या. दुकानात, लाकडी सॅडल्स आणि घोड्यांसाठी जीन बनवले जात होते. लुईस ब्रेलसाठी खेळणी खरेदी करावी, इतके सधन त्यांचे कुटुंब नव्हते. यामुळेच लुईस ब्रेल आपल्या वडिलांच्या दुकानातील वस्तुंनीच खेळ खेळायचे. दुकानत घोड्यांसाठी बनवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खेळणी समान होत्या.
एक दिवशी असेच दुकानात खेळत असताना एका तीक्ष्ण वस्तूने अचानक लुईस ब्रेल यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्या डोळ्यांतून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यावेळी त्यांच्यावर महागडे उपचार करण्या इतके पैसे त्यांच्या कुटुंबाकडे नव्हते. म्हणून घरी पट्टी बांधून डोळा बरे होण्याची अपेक्षा केली जात होती. परिणामी ही जखम गंभीर होत गेली आणि कालांतराने दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग झाल्यामुळे लुईस ब्रेलचे यांचे दोन्ही डोळे कायमचे निकामी झाले.
कायमचे अंधत्व
डोळ्यांची ही दुखापत वयाच्या तिसऱ्या वर्षी झाली, पण वयाच्या 8व्या वर्षी लुईस ब्रेल यांना कायमचे अंधत्व आले. आयुष्यात हे सर्व चढ-उतार असूनही लुईस ब्रेल यांनी आपले धैर्य गमावले नाही आणि अभ्यास करून, पुढे काहीतरी मोठे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला (World Braille Day special story on Louis braille).
लुईस ब्रेल यांची शिक्षणाकडे ओढ बघून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना फ्रान्सचे प्रसिद्ध धर्मगुरू व्हॅलेंटाईन यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले. व्हॅलेंटाईन यांनी लुईसची प्रतिभा ओळखली आणि 1819मध्ये ‘रॉयल इन्स्टिट्यूट्स फॉर ब्लाइंड्स’ येथे त्यांना प्रवेश मिळवून दिला. जसजसा वेळ जात होता, अभ्यासाबरोबरच लुईस ब्रेल यांना समजले की, आपण ज्या समस्यांमधून जात आहोत, त्यातून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. वयाच्या 12व्या वर्षी लुईस ब्रेल यांना समजले की, रॉयल आर्मीच्या निवृत्त कॅप्टन चार्ल्स बार्बर यांनी सैन्यासाठी एक खास लिपी तयार केली आहे.
ब्रेल लिपीचा शोध
ही लिपी अशी होती की, लाकडावर लिहिलेले शब्द चाचपडून वाचता येतील. कॅप्टन चार्ल्स बार्बर यांनी महायुद्धात डोळे गमावलेल्या सैनिकांसाठी ही लिपी तयार केली होती. लुईसला या लिपीबद्दल कळताच त्यांनी फादर व्हॅलेंटाईनला सांगितले की, आपल्याला कॅप्टन चार्ल्स बार्बरला भेटायचे आहे. कॅप्टनला भेटल्यानंतर चार्ल्स लुईस यांनी, बार्बर यांना तयार केलेल्या लिपीमध्ये काही बदल करण्याचा प्रस्ताव दिला.
कॅप्टन बार्बर, लुईसचा प्रस्ताव ऐकून अवाक् झाले. परंतु, त्यांनी त्या सर्व सुधारणा केल्या. नंतर लुईस ब्रेलने या लिपीमध्ये अनेक आवश्यक बदल केले. आणि 1829मध्ये लुईस यांनी 6 बिंदूंवर आधारित आधारे ब्रेल लिपीचा शोध लावला. आज या लिपीत अनेक आवश्यक सुधारणा झाल्या आहेत. परंतु, तिचा पाया मात्र लुईस ब्रेल यांनी घातला होता.
(World Braille Day special story on Louis braille)
हेही वाचा :
‘पीछे तो देखो पीछे’ सांगणारा अहमद शाहचा नवा व्हिडीओ, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊसhttps://t.co/zva12juIrz#AhmadShah | #Pichedekho |#Pakistan
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021