Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

टिक टॉक कंपनी अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, अशा स्पष्ट शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी टिक टॉकला इशारा दिला आहे.

Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 9:52 PM

नवी दिल्ली : कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे (World Corona Virus News Update). या आजारावर औषध शोधण्याचं, त्याची चाचणी करुन लवकरात लवकर ते औषध सामान्य माणसांसाठी उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न जगातील अनेक देश करत आहेत. भारतातही त्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (World Corona Virus News Update)

टिक-टॉक कंपनी अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

टिक टॉक कंपनी अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, अशा स्पष्ट शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी टिक टॉकला इशारा दिला आहे. भारताने टिक-टॉक बॅन केलं. मात्र, अमेरिकेनं त्याचं पुढचं पाऊल टाकून एक तर अॅप अमेरिकन कंपनीला विका, नाहीतर देशातून निघा, अशी अटच टिक-टॉक कंपनीपुढे ठेवली. त्यामुळे नाईलाजाने टिकटॉकची कंपनी विक्रीसाठी तयार झाल्याचं बोललं जातं आहे. बिल गेस्ट यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी अमेरिकेतील टिक-टॉकचे सर्व व्यवसाय खरेदी करणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

फिनलँडच्या पंतप्रधानांचा विवाह सोहळा

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी फुटबॉलपटूशी लग्न केलं. 34 वर्षांच्या सना मरीन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. रविवारी (2 ऑगस्ट) त्यांनी इन्साग्रामवर फोटो ट्विट करुन लग्नाची माहिती दिली. अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांचं लग्न झालं. पंतप्रधानपदी असूनही फक्त 40 पाहुण्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं गेलं होतं. पंतप्रधान सना मरीन आणि फुटबॉलपटू मार्कस रायकोनेन हे दोन्ही बालपणापासूनचे मित्र आहेत (World Corona Virus News Update).

मागच्या 16 वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. कोरोनाच्या काळात पंतप्रधानपदावर आरुढ असलेल्या व्यक्तीने साध्या पद्धतीनं केलेलं लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.

आवाजाने कोरोना झाला की नाही कळणार

आता फक्त एखाद्या व्यक्तीच्या आवाजानंही त्याला कोरोना झाला आहे की नाही, याची चाचपणी सुरु झाली आहे. दिल्लीत हा अनोखा प्रयोग सुरु आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली तर फक्त 30 सेकंदातच एखाद्या व्यक्तीला त्याचा कोरोना रिपोर्ट मिळू शकेल. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात ही चाचणी सुरु आहे. चाचणीसाठी एकूण 10 हजार लोकांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. एकूण दोन वेळा ही चाचणी होईल. त्यानंतर हा अनोखा प्रयोग यशस्वी ठरला की नाही, याची माहिती दिली जाणार आहे.

टिक-टॉक कंपनी अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

ब्रिटनमध्ये जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवलात, तर त्याचं अर्ध बिल आता ब्रिटनचं सरकार देणार आहे. कोरोनामुळे हॉटेलचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी ब्रिटनच्या सरकारनं ही योजना आखली आहे. लोकांनी बाहेर पडून जास्तीत-जास्त हॉटेलिंग करावं, हा त्यामागचा हेतू आहे. हॉटेल व्यवसायला थेट पॅकेज जाहीर करण्याऐवजी ब्रिटन सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलं जातं आहे.

भारताचा मृत्यूदर घसरला

कोरोनामुळे भारतात मृत्यू झालेल्या 50 टक्के लोकांचं वय हे सरासरी 60 च्या पुढचं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय. त्यामुळे वृद्धांना मास्क घालणं आणि इतर आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे भारतातला मृत्यूदर कमी होत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भारतातला मृत्यूदर 3.36 टक्के होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तोच दर कमी झाला आणि सध्या भारतातला मृत्यूदर हा 2.10 इतका आहे.

World Corona Virus News Update

संबंधित बातिम्या :

Kim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.