जगातले सगळ्यात मोठे ट्रॅफीक जाम कुठे झाले होते ? वाहने तब्बल 12 दिवस एकाच जागी अडकून पडली होती…
आपल्या मुंबईत देखील ट्रॅफीक जाम होत असतो. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री एकदा मुंबईत उद्योजकांच्या परिषदेत भाषण करताना म्हणाल्या होत्या काय ठेवलंय या मुंबईत.. माणसाचं अर्धे आयुष्य येथे ट्रॅफीक जाम मध्ये जाते. त्यापेक्षा आमच्या गुजरातमध्ये या ? परंतू जगातले सर्वात मोठे ट्रॅफीक जाम माहीती आहे का ?
ट्रॅफीक जाम ही सर्व मेट्रो शहरातील ज्वलंत समस्या बनली आहे. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत लोक ट्रॅफीक जामवर नेहमीच तावातावाने बोलत असतात. परंतू तुम्हाला जगातील सर्वात दीर्घ चाललेले ट्रॅफीक जाम माहिती आहे का ? लोकसंख्येत आपली स्पर्धा करणारा चीन याबाबत कुख्यात आहे. चीनमध्ये चौदा वर्षांपूर्वी बिजींग ते तिबेट हायवेवर एक ट्रॅफीक जाम झाला होता. या ट्रॅफीक जाममध्ये दहा ते बारा तास लोक एकाच जागी अडकून पडले होते….
मुंबईत कधी घोडबंदरला ट्रॅफीक जाम होते. तर कधी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तर कधी मुंबई गोवा हायवेवर तर कधी मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवेवर आपल्याला हे काही तास चालणारे ट्रॅफीक जाम नकोसं वाटते. तर तिथे चीनमधले ट्रॅफीक जाम बारा दिवस चालले होते. ही घटना 14 ऑगस्ट 2010 रोजीची आहे. ज्यावेळी चीनच्या नॅशनल हायवेवर 110 वर लागलेले ट्रॅफीक जाम जगभरातील चर्चेचा विषय बनले होते.
हायवेवर वस्तू विक्रेत्यांची चांदी
12 दिवस चाललेल्या या ट्रॅफीक जाम अडकलेल्या लोकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. कारण गाड्यांना धड मागे नेता येत नव्हते की पुढे ..मधल्यामध्येच अडकून पडावे लागले. अनेक लोक आपल्या गाडीतच जेवण करीत होते आणि झोपत देखील होते.ट्रॅफीक जाममुळे हायवेवर स्नॅक्स, कोल्ड ड्रींक आणि न्युडल्स आणि बंद बॉटलमधील पाणी विक्रेत्यांची ठेले लागले होते. त्यांचा धंदा तुफान झाला होता. त्यांनी दहा पट किंमती वाढविल्या होत्या आणि अडकलेल्या लोकांनी ते बंद पाकिटातील खाद्यपदार्थ खाण्यावाचून पर्यायच राहीला नाही.
कशामुळे ट्रॅफीक जाम झाला
बिजिंग-तिबेट हायवेवर मोठ्या संख्येने कोळसा लादलेले ट्रक एकाच वेळी रस्त्यावर आले होते. तसेच बांधकाम साहित्याचे ट्रक मंगोलियावरुन चीनच्या बिजींगला चालले होते. या ट्रकना मार्ग करण्यासाठी सर्व कारना सिंगल लेनवर चालविण्याचा आदेश मिळाला होता. याच दरम्यान डाऊन आणि अप जाणाऱ्या कारना सिंगल लेन करायला लावल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. आणि पहाता पहाता वाहने शंभर किमीपर्यंत अडकून पडली.
कसा संपला ट्रॅफीक जाम ?
हा ट्रॅफिक जाम अखेर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एकदाचा सुटला. स्थानिक प्रशासनाने मोठ्या अवजड वाहनांना हायवेवरुन हटविण्यासाठी थेट क्रेन आणि जेसीबीची मदत घेतली. एक-एक करुन सर्व ट्रक, ट्रेलर आणि टेम्पोंना हटविले. त्यानंतर हायवेच्या दोन्ही लेन सुरु झाल्या. त्यानंतरही वाहनांना त्यातून बाहेर पडायला वेळ लागत असल्याने 100 किमीची ही वाहतूक कोंडी दररोज एक किमी या कृमगतीने हळूहळू कमी होत गेली.त्यानंतर अखेर 12 दिवसांनी 26 ऑगस्ट 2010 रोजी हा ट्रॅफीक जाम एकदासा सुटला आणि चीनच्या प्रशासनाने आणि मोटारचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.